नोकरीच्या आमिषाने १४० जणांची फसवणूक , ४८ लाख हडपले

सीमा शुल्क विभागातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून एका भामट्याने १४० जणांची फसवणूक केली आहे. 
नवी मुंबई/ पनवेल
सीमा शुल्क विभागात वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून भामट्याने १४० जनाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी ४८ लाख रुपये घेऊन पलायन केलेल्या संतोष पाटील विरोधात गुरुवारी खारघरमध्ये गुन्ह्या दाखल झाला आहे. 
खारघरच्या सेक्टर १५ मध्ये राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता योगिता कडू याना फेब्रुवारी संतोष पाटील याने फोन केला. नातेवाईक असल्याचे सांगून भेटण्यासाठी वेळ मागितली . भेटीत केंद्रीय सीमा शुल्क व उत्पादन विभागाचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगितले . सीमा शुल्क विभागात कर्मचारी भरतीचे काम करत असून तुमच्या सम्पर्कात कोणी असल्यास त्याला माझा संपर्क नंबर द्या, असेही सांगितले. अधीकारी वेशातील याच्या वेशात भेटण्यासाठी घरी आल्यामुळे व ओळखपत्रहि दाखवल्यामुळे त्याच्यावर विश्वास बसला. योगिता याना नोकरीची आवश्यकता आहे. याशिवाय पुतण्या अमर कडू, परेश कडू, राज कडू, याशिवाय परिचितांपैकी निमिता पाटील, नीलेश ठाकूर , जयेश ठाकूर , लोचना पाटील, नयना ठाकूर , निकेत तांडेल, दिनेश पाटील, अक्षय म्हात्रे, संगीता विनेरकर  यांनाही नोकरीची आवश्यकता आहे. त्यांना नोकरी मिळून देता येईल का? अशी विचारणाही केली. पाटील यांनी शिक्षणाप्रमाणे शिपाई, सुरक्षारक्षक ,सीमा रक्षक अधिकारी पदावर नियुक्ती करण्यासाठी पदाप्रमाणे ३५००, १०५००, २५ ,०००, ३५,०००,शुल्क भरावे लागतील असे सांगितले. 
फेब्रुवारी ते ऑगस्ट २०१८ दरम्यान १४० जणांनी त्याच्याकडे तब्बल ४८ लाख रुपये जमा करत आवश्यक ती कागदपत्रे हि सादर केली. ज्यांनी पैसे भरले त्यांना गणवेश व नामफलक देऊन त्या सगळ्यांना फोटो काढण्यास सांगितले. सर्वांची यादी बनवून ती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी पाटील घेऊन गेला. थोड्या दिवसांनी रिव्हाल्वर परवान्यासाठी १५ हजार ५०० रुपयाची मागणी केली. यामुळे सर्वाना संशय आला त्याने दिलेली ओळखपत्र व नियुक्ती विषयी खात्री केली असता सर्व बनावट असल्याचे निदर्शनास आले. यामुळे या प्रकरणी गुरुवारी खारघर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. 


खोटी नियुक्ती पत्रे. 

संतोषने पैसे भरलेल्या जवळजवळ १४० जणांना खोटी नियुक्ती पत्रे हि दिली आहेत. सर्व्हिस बुक , मेडिकल कार्डही दिले होते. लवकरच या सर्वांची न्हावा - शेवा , ठाणे, दिघी, नागोठणे,नाशिक, देवळाली व इतर ठिकणी नियुक्ती केली जाईल असे आश्वासन दिले. फेब्रुवारी , २०१८ पासून अनेकांकडून पेसे  घेत होता. नोकरी लावण्यासाठी विलंब होत असल्याने सर्वानी विचारणा करण्यास सुरुवात केली. तेव्हा मला १४ , ००० जणांच्या नियुक्तीचे काम कराचे आहे असे याने सांगितले. मार्च, २०१९ नंतर त्याचे पाचही नंबर बंद लागले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने