गडहिंगलज मध्ये नाट्यगृह !!!

गडहिंगलज मध्ये नाट्यगृह नसल्यामुळे अनेक नाट्यकलाकार आणि रसिकांची गैरसोय होते. लवकरच नाट्यगृहाच्या प्रश्न सोडवला जाईल तसेच जानेवरी मध्ये नाट्यमहोस्तवाचे आयोजन  करण्यात येईल असं नगराध्यक्षा स्वातीताई कोरी यांनी सांगितलं गडहिंग्लज कला अकादमीच्यावर्धापनदिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.गडहिंग्लजमध्ये नाट्य चळवळ रुजवण्यासाठी गडहिंग्लज कला अकादमीची स्थापना करण्यात आली. गडहिंग्लजच्या पहिल्या वर्धापन दिना निमित्य नाट्यकलाविष्काराचं आयोजन करण्यात आलं होत . नगर पालिकेच्या  शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ रंग कर्मी जे.बी.पाटील यांच्या हस्ते झालं.नगराध्यक्षा स्वातीताई कोरी अध्यक्षस्थानी होत्या.ह्या वेळी बोलताना त्यांनी नगरपालिकेच्या वतीनं सुसज्ज नाट्यगुह उभारणीसाठी प्रयन्त केले जातील असं त्यांनी सांगितलं जानेवारी मध्ये गडहिंग्लज मध्ये नाट्य मोहोत्सव आयोजित केला जाणार असल्याचे सांगितलं.कला अकादमीला नगरपालिकेचं सहकार्य राहील असं हि त्या म्हणाल्या.दरम्यान कला अकादमीच्या बाल कलाकारांनी लघुनाटिकाकी बाल नाटिका, मुख नाट्य,रिघन नाट्य, नृत्य , एकपात्री  असे कलाविष्कार सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली.पर्वणीउपराटे या चिमुकलीने मोबाइचा अतिवापर वसेल्फीचं वेड हे मूक नाट्याद्वारे सादर केलं. पूर्वी बुगडे हीन मुलं आणि मुली यांच्या वागण्या बोलण्यातील फरक मूक नात्यातून विनोदी पद्धतीने सादर केला. शाळाया विनोदी लघु नाटकांवर प्रेक्षक पोट धरून हसले.तरशेवटी सर्व कलाकारांनी सादर केलेल्या पाल चिकटलेली आहे या नाटकातून समाजातील अहंकार, अपेक्षा, भ्रष्ट्राचार, स्वार्थ, अशा दुर्गुणांवर केलेले भाष्य प्रेक्षकांना अंतर्मुख करून गेलं. कला अकादमीचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी प्रास्ताविक केलं. ह्यावेळी  प्राध्यपक अशपात माकानदार, प्राध्यापक निलेश शेळके, सुनील चौगुले, नागेश चौगले, सचिन मगदूम , सुहास पुजारी, प्रकाश भोईटे, उज्वला दळवी यांच्यासह नाट्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने