कोल्हापूर नगरोत्थान चा निधी पडून :

“ नगरोत्थान “ चा निधी पडून : कोल्हापूर 
जिल्हा नियोजन समितीतून नगरोत्थान यॊजनेंतर्गत महापालिकेला दिलेल्या ४ कोटी १० लाख २५ हजार रुपयांचा निधी पडून आहे. गेले तीन वर्षात हा निधी खर्च केल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे नाही . याबाबत  महापालिकाप्रशासनाकडे विचारणा केली जाणार आहे.

अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या महापुराने शहरातील रस्ते खराब झाले आहेत. शहरातील सुमारे की.मी.चे रस्ते खराब झाल्याने त्यांच्या दुरुस्तीचा गरज असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.यापैकी काही रस्ते हे नव्याने करण्याची  गरज आहे. या रस्त्यासाठी निधी मिळावा अशी , मागणी महापालिका नगरसेवकांनाही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. शहरातील विविध संस्था , संघटनाही रस्त्यासाठी निधी द्यावा अशी मागणी करत आहेत. 

रस्त्यासाठी महापालिकेकडे निधी नाही , ओरड होत असतानाच गेल्या तीन वर्षात ‘ नगरोत्थान ‘ मधून दिलेला ४ कोटी १० लाख २५ हजार रुपयांचा निधी खर्च झालेला नाही. अशी कागदोपत्री तरी परिस्थिती आहे.  हा निधी खर्च झाल्याबाबतची कोणतीही माहिती, त्याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही.ल यामुळे प्रशासनाकडे हा निधी अखर्चिकच आहे.

महापालिकेला दिलेल्या निधीच्या खर्चाचे हिशेब वारंवार माहितीला जात आहे. यापूर्वीचा निधीच्या खर्चाची माहिती दिल्याखेरीच नवीन निधी दिला जाणार नाही, असा सूचना वजा दमही महापालिकेला दिला होता. तरीही हा निधी खर्च झाला कि नाही, याची माहिती महानगरपालिकेने दिलेली नाही. यामुळे एकीकडे निधी नाही म्हणायचं आणि मिळालेला निधी खर्च करायचा नाही, असे चित्र सध्या महापालिकेत दिसत आहे. 

महापालिकेस जयसिंगपूर, कुरुंदवाड, मुरगूड, पन्हाळा आणि हुपरी नागरपालिकांनाही नगरोत्थान मधून दिलेला निधी अखर्चिकच राहिला आहे. जयसिंगपूर , नगरपालिकेचा ३९ लाख रुपयांचा, कुरुंदवाडचा १० लाख५६ हजारांचा, मुरगूडचा ३४ लाख ७९ हजारांचा, पन्हाळाचा ६५ लाख ५८ हजाराचा तर हुपरी नगरपालीकरचा १४ लाख ८१ हजारांचा निधी ,असा जिल्ह्यात महापालिका व नगरपालिका एकूण ५ कोटी ७५ लाखांचा निधी अखर्चीक दिसत आहे.

kolhapur


महापालिकेचा अखर्चीक निधी 

     साल                निधी [रक्कम लाखांत]
२०१५-१६               ३१. . ६९ 
२०१६-१७               १२७. ७७ 
२०१७-१८               २५०. ७८
एकूण                   ४१०. २५ 
निधी परत  जाण्याचा धोका 
नगरोत्थानच्या निधीच्या खर्चाला दोन वर्षाची मुदत असते. यामुळे महापालिकेला मिळालेला हा निधी खर्च झाला नसेल तर परत जाण्याचा धोका आहे. हा निधी परत जाऊ नये यासाठी राज्य शासनाकडे त्याला मुदतवाढही मागता येऊ शकते. जर सरकारने मुदतवाढ दिली तरच हा निधी खर्च करणे शक्य होणार आहे. 

दलितेत्तर योजनेचाही १ कोटी ४ लाख पडून 
दलितेत्तर योजनेसाठी दिला जाणारा गेल्या तीन वर्षातील महापालिकेचा १ कोटी ४ लाख १८ हजार रुपयांचा निधी पडून आहे. यासह हुपरी , मुरगूड, मलकापूर, कुरुंवाद,  आणि जयसिंगपूर या नगरपालिकांचा एकूण १ कोटी ५७ लाख ५५ हजार रुपयांचा निधी खर्च झालेला नाही. 

थोडे नवीन जरा जुने