बावडेकर मटण दराबाबत अद्यापही ठाम

आठ्वड्यानंतरही तोडगा नाही: विक्रेत्यांनी मागितली पुन्हा आठ दिवसांची मुदत .पॅव्हेलियन मैदानावर रविवारी ग्रामस्थांच्या बरोबर झालेल्या बैठकीत विक्रेत्यांनी पुन्हा एक आठवड्याची मुदत वाढ मागून घेतली आहे. ग्रामस्थ ४०० रुपये मिक्स व ४५० रुपये प्युअर मटण या दरावरती  ठाम आहेत.

दरम्यान , मटण मार्केटमधील आठ पैकी दोन गाळे  पर्यायी व्यवस्थेसाठी उपलब्ध करून देण्याबाबत ग्रामस्त हालचालीत आहेत . 

मटण दरवाढीविरोधी आंदोलनांची सुरुवात कसबा बावड्यातून झाली. गेला एक आठवडा येथील मटण विक्रेत्यांची मटण विक्री बंद आहे, ग्रामस्थांनी नदीपलीकडे ठरलेल्या दरात मटण उपलब्ध करून दिले आहे.  या आंदोलनाचा वनवा आता जिल्ह्याबाहेर पसरला आहे. 



मटन दराबाबत चर्चा करून निर्णय घेण्याबाबत विक्रेत्यांना एक आठवड्याची मुदत दिली होती. त्या अनुषंगाने रविवारी पॅव्हेलियन मैदानावर ग्रामस्थ व विक्रेते यांच्यात बैठक झाली. ह्यावेळी ग्रामस्थ ४०० रुपये प्रतिकिलो दराने मिक्स, व रुपये ४५० दराने प्युअर मटण घेण्याच्या  निर्णयावर पक्के होते. यावर आणखी आठवडा आम्हाला विचार करण्यासाठी मुदत द्या . लवकरात लवकर आम्ही आपणास निर्णय कळवतो असे म्हणाले. बावडेकरांनी गेल्या उस्फुर्त पने आंदोलन करून ठरवलेल्या दरात मटण मिळण्याची पर्यायी व्यवस्था केली होती. त्याप्रमाणे बुधवार पासून मटण विक्री हि  सुरु झाली होती.बावडेकरांनी खरेदीसाठी उदंड प्रतिसाद दिला.त्यामुळे आठवड्याभरात हे अंगवळणी त्यामुळे बावड्यातील मटण विक्रेतेही हवाल दिल झाले आहेत. 

रविवारी बैठकीत विक्रेत्यांनी  भावनिक साद घालत आम्हाला ग्रामस्थांच्या दरात मटण विक्री परवडत नसल्याचे सांगितले. बावडेकरानी बाहेरच्या विक्रेत्यांना हा दार परवडतो तसेच कोल्हापुरात पण ह्याच दराने विक्री सुरु  आहे त्यामुळे आमचा दर मान्य करावंच लागेल असे ठणकावून सांगितले.

यावेळी ग्रामस्थांनी सध्याच्या मटण विक्रेत्याच्या ताब्यात असणाऱ्या गळ्यापैकी दोन गाळे बावडेकर ज्या विक्रेत्यांची व्यवस्था करतील त्याना  उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही केली.यासंदर्भात महापालिकेकडून हे गेले ताब्यात घेण्यासंदर्भात स्थानिक नागरसेवकांमार्फत पाठपुरावा करण्यात यावा, असेही ठरवण्यात आले.

थोडे नवीन जरा जुने