बेपत्ता बालिकेचा खून: संशयित आरोपीची आत्महत्त्या

“कोडणी येथील घटना ;  कपाटात लपविला होता मृतदेह: चार दिवसापासून बालिका बेपत्ता होती”

निपाणी: कोडणी [ ता.निपाणी] येथील चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या साडेतीन वर्षाच्या बालिकेचा खून झाल्याचे सोमवारी समजले.  या प्रकारातील संशयित कुमार राणोजी [ वय ५० ] याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संशयिताच्या घरातील बंद कपाटात या बालिकेचा मृतदेह सापडल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.  खुनापूर्वी तिच्यावर अत्याचार झाला असावा असा संशय ग्रामस्तातून बोलला जात होता. 


शुक्रवारी [दि . २२ ] कोडणी येथील साडेतीन वर्षाची बालिका बेपत्ता झाली होती. सायंकाळी तिच्या वडिलांनी याबाबत तक्रार निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये दिली. त्यानंतर पोलिसानी शोधमोहीम राबवली होती. ग्रामस्थांच्या सहकार्याने या बालिकेच्या पालकांनी सोशल मीडियावर आवाहन केलं तसेच अन्य ठिकाणी शोधाशोध घेतली. मात्र , तिचा शोध कुठेही लागला नाही. दरम्यान , शेजारीच राहणाऱ्या कुमार माने याच्या हालचालीवर संशय आला . 

थोडे नवीन जरा जुने