महाराष्ट्राच्या राजकारणाला अनपेक्षित वळण

महाराष्ट्राच्या राजकारणाला अनपेक्षित वळण लागले असून आज सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणीस यांनी  पुन्हा शपथ घेतली आहे. तर धक्कादायक बातमी म्हणजे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदची शपथ घेतली आहे.  त्यानंतर आता रोहित पवार यांची भूमिका काय असणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना काही मिनिटा पूर्वी  त्यांनी फेस बुक पेज वरील आपला प्रोफाईल फोटो बदलला व शरद पवार यांच्या सोबत असलेला फोटो टाकला आहे. त्यामुळे ते  शरद पवारांच्या सोबत राहणार असल्याचे बोलले जात आहे.

राज्यातील सत्ता स्थापन निमित्याने आज सकाळी  घडलेल्या घडामोडी पाहता सुप्रिया सुळे यांनी आपला व्हाट्सअपवर पार्टी आणि  कुटूंब फुटले असल्याचे स्टेटस ठेवल्याने पवार कुटुंबात फूट पडल्याचे दिसून आले.. तर  शरद पवार व अजित पवार असे दोन गट पवार कुटूंबात तयार झाले आहेत. त्यामुळे रोहित पवार हे नेमके कोणा सोबत जाणार  हे पाहायला मिळत होत.

Rohit pawar posted this photo on facebook


मात्र काही मिनिटांपूर्वी रोहित पवारांनी आपला फेसबुकच्या पेजवर प्रोफाईल फोटो बदलून तो शरद यांच्यासोबत अपलोड केला आहे. रोहित पवार हे शरद पवारांच्या सोबत असल्याचे बोललं जातंय. 


त्याचबरोबर त्यांनी एक तासांपूर्वी शरद पवारांच्या सोबतचा त्यांनी दुसरा फोटो अपलोड केला होता.त्यात  महाराष्ट्राचा “ लोकनेता म्हणून त्यांनी पवारांचा उल्लेख केला होता. त्यामुळे पवार कुटुंबात निर्माण झालेल्या  दोन गटात रोहित पवार आणि सुप्रिया सुळे हे शरद पवारां सोबत राहणार असल्याचे स्पष्ट झालाय.
थोडे नवीन जरा जुने