संजू सॅमसनची एन्ट्री : शिखर धवन संघातून आउट

कोलकत्ता येथे २१ नोव्हेंबरला वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि २०-२० सामन्यासाठी भारतीय संघाची बैठक झाली होती. 
मुंबई ; भारतविरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील टेन्टी -२० सामन्याच्या मालिकेतून शिखर धवन आउट झाल्याचे कळते आहे. धवनच्या जागी यावेळी एकही सामना न खेळात संघाबाहेर काढलेल्या संजू सॅमसनला संधी दिली आहे ,असे समजते. 
कोलकत्ता येथे २१ नोव्हेंबरला वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे आणि २०-२० सामन्यासाठी निवडसमितीची बैठक झाली होती, या बैठकीला निवड समिती सदस्य, कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे उपस्थित होते. यावेळी संजूला  संघातून काढल्यामुळे जोरदार टीका निवड समितीवर झाली होती. 


भारतीय क्रिकेट संघ सध्या चांगली कामगिरी करतोय. बीसीसीआयचे अध्यक्षपद भारताचे माझी कर्णधार सौरव गांगुली यांच्याकडे आल्यामुळे बरेच चांगले बदल पाहायला मिळाले. पण तरीही भारताच्या निवड समितीवर कुणी ना कुणी टीका करत असत.ल त्यामुळे आता निवड समितीमध्ये बदल करण्याची वेल आली आहे , असे म्हटले जाते. 
 


विश्वचषकाच्यावेळी भारताच्या निवड समितीचे सदस्य विराट कोहली यांच्या पत्नीचे चहाचे कप उचलत होते , अशी जोरदार टीका माझी क्रिकेटपटू फारुख इंजिनियर यांनी केली होती. महेंद्रसिंग धोनीबाबत वक्तव्य केल्यानंतर निवड समिती अध्यक्ष एम एस के प्रसाद याना चाहत्यांनी चांगलेच धारेवर धरले होते.. त्याचबरोबर निवड समिती सदस्य हे कोहलीला आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या हातातील बाहुले आहेत, अशीही टीका होत होती .त्यामुळे आता निवड समितीमध्ये वजनदार व्यक्ती यायला हवी आणि गांगुली हे गोष्ट नक्कीच करेल, असा विश्वास फिरकीपटू  हरभजनसिंग यांनी व्यक्त केला आहे.

संजू सॅमसनला य खेळवता संघातून काढल्याबद्दल काँग्रेसचे लोकसभा सदस्य शशी थरूर यांनी एक ट्विट केले होते. या ट्विट ला हरभजनसिगने उत्तर दिले आहे. याबाबत हरभजन म्हणाला कि, “ निवड समिती संजुची परीक्षा पाहत असावी.  पण निवड समितीमध्ये बदल करण्याची गरज आहे कोणी तरी मजबूत व्यक्ती या पदासाठी असायला हवी. मला विश्वास आहे कि गांगुली नक्कीच योग्य बदल करेल. “ थोडे नवीन जरा जुने