सरकारला विधानसभेत तोंडघाशी पाडण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांची जोरदार तयारी



राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार याना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या सरकारला विधानसभेत तोंडघाशी पाडण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेते जोरदार तयारी करत आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार याना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या सरकारला विधानसभेत तोंडघाशी पाडण्यासाठी शिवसेना. , राष्ट्रवादी काँग्रेस, व काँग्रेस चे नेते जोरदार तयारीत आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या ५४ पैकी ५० आमदाराचा पाठिंबा मिळवला , तर काँग्रेस आणि शिवसेनेने त्यांचे आमदार सुरक्षित ठेवले आहेत.
राज्यपाल भगतसिंग  कोश्यारी यांनी भाजपचे  देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व  राष्ट्रवादीचे अजित पवार याना उपमुख्यमंत्री  म्हणून शपथ दिली. मात्र, या सरकारकडे बहुमत नसल्याचे सिद्ध करण्यासाठीविरोधकानी  जोरदार फिल्डिंग लावली आहे. या तिन्ही पक्षांना सोमवारी कोर्टात शपथपत्र सादर करायचे  त्यांच्याकडे आवश्यक संख्याबळ आहे, हे सिद्ध करण्यासाठी शिवसेना ५६ ,काँग्रेस ४४ , राष्ट्रवादी ४८ याचे आमदारांच्या सह्यांचे शपथपत्र तयार आहे. 

अजित पवार यांच्या बंदमुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडेल, असे दिसत असतानाच पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार यांनी सर्व राजकीय कौशल्य पणाला लावले, व ५४ पैकी ५० आमदारांचा पाठिंबा मिळवला . कोर्टात सोमवारी दाखल करायच्या शपथपर्तावर राष्ट्रवादीच्या ४८ आमदाराच्या सह्या झाल्या आहेत. दौलत दरोडा व नितीन पवार हे दोन्ही आमदार मुंबई असे बाहेर असून ते संपर्कात आहेत,  असे नवाब मलिक यांनी सांगितले सध्या अजित पवार याच्या सोबत तीन आमदार आहेत. 

  पक्षनेत्यासमोर धनंजय मुंडेंनी बाजू मांडली. 
अजित पवारांच्या बंडाचा सगळा कट धनंजय मुंडे याच्या बंगल्यावर शिजला आहे, त्यामुळे मुंडे याच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जात होता,त्यांनी आपली बाजू  शरद पवार,सुप्रिया सुळे, यांच्या पुढे मांडली. आणि उद्धव ठाकरे याच्याशी बंदद्वारा चर्चा करून त्यांच्यामनातं आपल्याविषयी असणारी मळभ दूर करण्याचा प्रयत्न केला. 


उद्धव ठाकरे यांनी  घेतल्या भेटी. 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांनी रविवारी राष्ट्रवादी व काँग्रेस आमदारांच्या भेटी घेऊन आपण सर्वजण सोबत असल्याचा संदेश दिला. आपल्याला हि लढाई दोन - तीन  वर्षापुरती लढायची नसून, ती बरेच दूरपर्यंत जायचं आहे. व मी शब्द पाळणारा नेता आहे असं त्यानं आमदारांना सांगितलं. 

कोणाचा दबाव आहे का…. ?
शरद पवार यांनी पण आमदारांना भेटून तुम्हाला कोणी दबावा खाली  आणत आहे का? असे विचारले, तेव्हा आम्हाला अजित पवारांचे फोन आले होते, पण आम्ही तुमच्यासोबत आहोत , असा ते म्हणाले. तुम्ही कोणत्याही दबावाला बळी पडू नका,सरकार आपलेच येणार आहे , असे शरद पवार म्हणाले. 
थोडे नवीन जरा जुने