शपथविधी साठी दिले उद्धव ठाकरे यांनी “ या “ शेतकरी दाम्पत्याला आमंत्रण


महाविकासाआघाडीने मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे हे उद्या, गुरुवारी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीसाठी देशभरातील अनेक महत्वाच्या व्यक्तींना आमंत्रण दिले आहे. मात्र , या सगळ्या घाईगडबडीत उद्धव ठाकरे यांनी एका व्यक्तिला आवर्जून आमंत्रण पाठवले आहे. हे दाम्पत्य सांगली जिल्ह्यातील असून ते या शपथविधीस उपस्थित राहणार आहेत.काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे सांगलीच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी संजय सावंत आणि रुपाली सावंत या शेतकरी दांपत्याने उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. हे दाम्पत्य शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून निरंकारी उपवास करत ८५ किलोमीटर अनवाणी पायाने चालत पंढरपूरला गेले होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेत असताना स्टेजसमोर मला जवळ उभे करा, अशी विनंती संजय सावंत यांनी उद्धव ठाकरे यान केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी तुमचा संपर्क क्रमांक द्या, मी तुम्हाला शपथविधी सोहळ्यात स्टेजवर उभे करतो, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले होते. सोशल मीडियावर या प्रसंगी चांगलीच चर्चाही झाली होती.


आतापर्यंत ठाकरे घराण्यातील कोणतीही व्यक्तीने राजकीय पद स्वीकारले नव्हते. त्यांच्याकडून केवळ रिमोट कंट्रोलने सूत्रे हलवली जात होती. मात्र, आदित्य ठाकरे आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे घराणे पहिल्यादाच प्रत्यक्ष राजकारणाच्या मैदानात उतरणार आहे. 

थोडे नवीन जरा जुने