शिवतीर्थावर ऐतिहासिक सोहळयात “ ठाकरे सरकार” याचे राज्यारोहण ।

मुंबई : 
ज्या शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली , त्याच शिवतीर्थावर गुरुवारी विराट जनसागरच्या साक्षीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा १९ व मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते म्हणाले “ मी , उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो कि, ......: हे शब्द उच्यारताच शिवतीर्थावर तो इतिहासिक क्षणदेखील थरारुन उठला आणि या क्षणाचं साक्षीदार होण्यासाठी शिवतीर्थावर लोटलेला विराट जनसागरहि रोमांचित झाला. उद्धव यांच्यासह शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांनी, काँग्रेस तर्फे बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, आणि राष्ट्रावादी कडून जयंत पाटील, छगन भुजबळ यान सात नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. 
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या सर्वाना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसने स्थापन केलेल्या महाविकास आघाडीने घडवलेल्या सत्तांतराचा शपथ सोहळ्यासाठी तिन्ही पक्षाच्या राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी शिवतीर्थ ओसंडून वाहत होते. महाराष्ट्रातील या राजकीय प्रयोगाने नवे राजकीय समीकरण सुरु झाले आहे, व ते देशातील राजकारणाला वेगळे वळण देणारे असून, “ ठाकरे सरकार “ च्या राज्यारोहणामुळे शिवसेनेच्या राजकारणाला एक नवी कलाटणी मिळणार आहे. 
ठाकरे व शिवतीर्थ हे एक अजोड नाते  आहे. याच शिवतीर्थ वर प्रबोधनकार ठाकरे यांनी “ माझा बाळ मी महाराष्ट्राला  अर्पण केला “ असे असे ऐतिहासिक उद्गार काढले. बाळासाहेब ठाकरे यांची सिहंगर्जना सातत्याने याच शिवतीर्थावरून होत आली आहे. ‘ मला सांभाळलत , आता उद्धव आणि आदित्यला सांभाळा. ‘ अशी भावनिक साद शिवप्रमुखानी शिवतीर्थावरून समस्त महाराष्ट्र्राचा घातली. त्याच शिवतीर्थावर गुरुवारी महाराष्ट्राचे ठाकरे सरकार सत्तारूढ झाले. उद्धव यांचे नाव मुख्य सचिव अजोय मेहता यांनी मुख्यमंत्री म्हणून पुकारताच उपस्थित जनसागराने प्रचंड जल्लोष केला . उद्धव ठाकरे यांनी शिवाजी महाराजांना वंदन करून आई वडिलांचे स्मरण करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 
शपथविधी सोहळ्याला  घरातून निघण्यापूर्वी उद्धव ठाकरे याना औक्षण केले. भगवा कुर्ता , आणि कापला तिला असा उदाहव ठाकरे यांचा पेहराव होता. संध्याकाळी सव्वा सुमारास रश्मी ठाकरे यांच्यासह ते मातोश्रीमधून बाहेर पडले व ६. ३५ ला शिवतीर्थावर पोहोचले. 

भावुक उद्धव ठाकरे नतमस्तक ।
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बरोबर ६ वाजून ४५ मिनिटांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि विधानसभा निकालानंतर ३६ दिवसांनी महाराष्ट्राला मुख्यमंत्री लाभला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नेहमीच्या ठाकरी शैलीत दोन्ही हात उंचावून जनसागराला अभिवादन केले. ज्या शिवतीर्थावरून दसरा स्मृतीला वदंन करीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानतंर उद्धव ठाकरे कमालीचे भावुक झाले आणि ठाणी व्यासपीठावरच माथा टेकवला आणि तमाम महाराष्ट्रासमोर नतमस्तक झाले. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने