आज विश्वासदर्शक ठराव

मुंबई:
विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री बहुमत चाचणीला सामोरे जाणार
शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे सरकारची शनिवारी शक्तिपरीक्षा होणार असून विधानसभेत विश्वासदर्शक ठरवलं त्यांना सामोरे जावे लागणार आहे. यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आले. 
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसांचे हंगामी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचे सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करणार असल्याचे उच्यपदस्थ सूत्रांनी सांगितले.  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाआघाडीला बहुमत सिद्ध करण्यासाठी ३ डिसेंबर पर्यंतची मुदत दिली होती. महाविकास अगदीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या विधानसभेत विश्वासात्मक ठराव मांडतील . दुपारी दोनच्या सुमारास हे अधिवेशन सुरु होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 
तसेच विरोधी पक्षनेता व विधानसभा अध्यक्ष या पदाची निवड देखील उद्याच केली जाणार असल्याचे समजते. त्यासाठी हंगामी अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. 
आवश्यक बहुमत संख्या १४५ महाराष्ट्र विकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्यासाठी १४५ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. यात महाराष्ट्र विकास आघाडीत विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील. 

राष्ट्वादीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांची शुक्रवारी विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली; हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. राज्यपालांनी भाजप आमदार कालिदास कोळबकर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती, पण  उद्धव ठाकरे यांनी मुख्यामंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाविकास आघाडीने हंगामी अध्यक्ष बदलण्याची मागणी केली होती . त्यानुसार आता वळसे पाटील यांच्याकडे या पदाची सूत्रे दिली .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने