सॉफ्टवेअर इंजिनिअरला हाव पडली महागात: क्रेटा एसयूव्ही गिफ्टच्या नावाखाली ७ लाखांना गंडा


 पुणे : कोणीही कोणाला काहीही फुकट देत नसते, हे माहिती असतानाही कोणी गिफ्ट देत असल्याचे सांगितल्यावर भल्याभल्याकडून सारासार बुद्धी बाजूला ठेवली जाते आणि सायबर चोरटयांनी लावलेल्या जाळ्यात ते अलगद सापडत जातात.

  गिफ्टच्या आशेने ते सांगतील, तितके आणि सांगतील , त्या बँक खात्यात पैसे भारत राहतात. नंतर मग आपण फसविले गेल्याचे त्यांना लक्षात येते यामध्ये सुरक्षित लोकच अधिक फसले जात असल्याचे दिसूनयेत आहे, सायबर चोरटयांनी एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला आपल्या जाळ्यात अडकून त्याच्याकडून चक्क ७ लाख १७ हजार ५३० रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला .  याप्रकरणी कोंढव्यात राहणाऱ्या य एका ३८ वर्षाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने कोंढवा पोलिसांडकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २७ व २८ ऑगस्ट २०१९ रोजी ऑनलाईनच्या माध्यमातून घडला आहे. 

हे सॉफ्टवेअर इंजिनिअर मूळचे  कर्नाटक मधील धारवाड तेथील राहणारे असून मगरपट्टा येथील एका कंपनीत कामाला आहेत, त्यांच्या मोबाईलवर २७ ऑगस्टला पेटीएम कंपनीकडूनं एक मेसेज आला . त्यातील हेल्पलाईन नंबरवर त्यांनी फोन केला आदित्य मल्होत्रा नाव सांगण्याऱ्याने त्यांना पेटीएम मॉल कडून तुम्हाला गिफ्ट लागल्याचे सांगितले गिफ्टमधे दोन चॉईस देण्यात आले होते. त्यात तुम्ही १२ लाख ६० हजार रुपये कॅश जिंकू शकता केव्हा क्रेटा हि कार घेऊ शकता या सॉफ्टवेअर इंजिनियरने कॅश घेणे पसंद केले. कॅश हवी असेल तर तुम्हाला काही प्रोसिजर पूर्ण करावी लागेल हि रक्कम पूर्ण ट्रान्सफर करण्यासाठी सरकारी सर्टिफिकेट करिता त्याच्याकडे प्रथम ६,५०० रुपयांची मागणी केली . त्यांनी पैसे भरल्यानंतर पुन्हा फोन आला कि आवडी कॅश ट्रांसफर होऊ शकत नाही बँकेने ती रक्कम होल्ड केली आहे. त्यासाठी तुम्हाला आणखीन मार्जिन चार्जेस म्हणून २५ , २०० रुपये भरावे लागतील. ते पॆसे भटल्यावरच केंद्र सरकारचे ४८ हजार ८०० रुपये भरावे लागतील. असे सांगितले त्यानंतर बँकेचा वेळ संपल्याने लेट फी म्हणून १८, ८०० रुपये भरण्यास सांगितले. 
त्यानंतर फायनान्सिअररिपोर्टींग करता ४९, ५०० रुपये भरण्यास सांगितले, गिफ्ट मिळण्याच्या आशेने हे सॉफ्टवेअर इंजिनियर इतका उत्तेजित झाला होता कि, कोणताही विचार न करता सायबर चोरटे सांगतील तसे त्या बँक खात्यात पैसे भारत गेला अशा प्रकारे त्यानी २७ व २८ ऑगस्टला ऑगस्ट या दोन दिवसात तब्बल ७ लाख १७ हजार ५३० रुपये वेगळेवेगळ्या बँक खात्यात भरले गेले त्यानंतर त्यांच्याकडून फोन येणे बंद झालेतत् त्यांना सम्पर्क केल्यावर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली , ह्यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली.  
गिफ्टच्या बहाण्याने सायबर चोरटे मोठ्या प्रमाणावर फसवणूक करीत असल्याच्या बातम्या नेहमीच येत असतात या चोरट्याच्या अमिषाला बळी पडू नका, असे पोलीसांकडून वारंवार आवाहनही केले जात असते, असे असतानाही सॉफ्टवेअर तरुण असलेल्या या तरुणाला इतरांच्या मानाने चांगला पगार असतानाही फुकट मिळत असेल तर या लालचेने त्याच्याकडून शिल्लक सायबर चोरटयांनी हातोहात लांबवली. 


थोडे नवीन जरा जुने