सीईटी परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सरावासाठी उपलब्ध करणार ।

सीईटी परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सरावासाठी उपलब्ध करणार । 
मुंबई : 
विद्यार्थ्याना ऑनलाईन सीईटीची भीती वाटू नये, त्यासाठी परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थांनी सर्व परिक्षेची संधी राज्य सीईटी सेलकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. गतवर्षी एमएचटी-सीईटीची सर्व परीक्षा झाली होती. त्याच धर्तीवर सर्व अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध केल्या जाणार आहेत.

राज्य प्रवेश परीक्षा कक्ष [ सीईटी सेल ] तब्बल १४ परीक्षांचे वेळापत्रक बुधवारी जाहिर  केले .यामध्ये सर्वात महत्वाची मानली जाणारी एमएचटी-सीईटी परीक्षा १३ ते २३ एप्रिल या कालावधीत होणार आहे. तर एमबीएची सीईटी १४ आणि १५ मार्चला होणार आहे. एलएलबी तृतीय वर्ष २८ जून आणि एलएलबी ५ वर्ष १२ एप्रिल रोजी होणार आहे. अभियांत्रिकी आणि ओषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी प्रवेश १३ ते २३ एप्रिल २०२० या कालावधीत होणार आहेत. या परीक्षेला राज्यभरातून पाच लाखाहून अधिक विद्यार्थी नोंदणी करतात. यंदाही या परीक्षेत पीसीएमबी गटात केल्याने चुरस वाढणार आहे. इतर दोन गटात विद्यार्थी गतवर्षीपेक्षा वाढण्याची शक्यता आहे. 

विद्यार्थ्याना परीक्षेचा अंदाज यावा तसेच त्यांची भीती दूर व्हावी राज्य सीईटी सेलकडून सराव परीक्षेचे योग्य पद्धतीने नियोजन केले जाणार आहे. यासंर्भातील सूचना लवकरच संकेतस्थळावर दिल्या जाणार आहे. गतवर्षी एमएचटी सीईटी ऑनलाईन परीक्षेची भीती वाटू नये , यासाठी ठिकठिकाणी सराव परीक्षेची सुविधा विद्यार्थ्याना उपलब्ध करून दिली होती. त्याच धर्तीवर सर्वच परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी प्रामुख्याने सीईटी सेलचा प्रयन्त असणार आहे. 

थोडे नवीन जरा जुने