चिदम्बरम याना दिलासा

चिदम्बरम याना दिलासा 
“युपीए “माजी अर्थमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी . चिदम्बरम
याना अखेरीस सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. ‘ ईडी ‘ च्या एका खटल्यातील आरोपी म्हणून त्यांना हायकोर्टाने नाकारलेले जमिन सुप्रीम कोर्टाने मिळाला आहे. मात्र त्याचा जमीन अर्ज मान्य करतांना कोर्टाने त्यांच्यावर अनेक बंधने घातलेली असून, परदेश दौऱ्यालाही निर्बंध घातले आहेत. कोर्टाची परवानगी घेतल्याशिवाय त्याना परदेशवारी करतां येणार नाही किंवा खटल्याशी संबंधित विषयावर त्यांना कुठलाही टीकाटिपणी करता येणार नाही. स्वतः वकील असल्याने चिदम्बरम याना या निर्बंधांचा नेमका अर्थ कळतो.पण तिहार या कुख्यात तुरुंगाततुन मिळालेली सुटका, त्याच्यासाठी सुस्कारा सोडवा इतकी महत्वाची आहे. तब्बल १०६ दिवसांनी कोठडीत काढावे लागले आहेत. म्हणूनच खटल्याची सुनावणी होऊन पूर्ण निर्दोष ठरण्यापर्यंत माजी अर्थमंत्री त्यात कुठे गफलत करतील, अशी, बिल्कुल शक्यता नाही. कारण जमीन देतानाही कोर्टाने काही शेरेबाजी केलेली आहे, ती निर्दोष असल्याकडे बोट दाखवणारी नसल्याने सावध वर्तनाला पर्याय नाही.    सीबीआय व ईडी. ने आरोप दाखल केल्यापासून काँग्रेस पक्षाने राजकीय सूडबुद्धीचा खूप गहजब केला होता. पण न्यायालयीन कारवाईत त्याचा काहीही उपयोग झाला नाही. म्हणूनच प्रकरण राजकीय नाही. ते आथिर्क गंभीर गुन्हा दाखल असल्याची दखल सर्वांनीच घ्यावी लागेल. कारण हायकोर्ट वा सुप्रीम कोर्टाचे शेरे , त्या गांभीर्याकडे निर्देशित करणारे आहेत. म्हणूनच आता खुद्द चिदम्बरम त्यावर फारशी मल्लिनाथी करण्याची शक्यता कमीच आहे. पण या सुटकेचा काँग्रेस मात्र राजकीय भांडवल करणार आहे. ती त्या पक्षाची राजकीय गरजही आहे. : मात्र असे कलंक धुतले हात नाहीत, हे काँग्रेस ने लक्षात ठेवले पाहीकर. तसे नसते, तर सोनिया गांधी व मनमोहनसिंग यांनी तुरुंगात जाऊन चिदम्बरम याची घेत घेतली नसती, कि प्रियांका गांधीही तिथपर्यंत दिलासा देण्यासाठी गेल्या नसत्या. म्हणूनच ताज्या जमीन प्रकरणाकडे राजकीय य दृष्टीनेही बघणे योग्य ठरेल. गुन्हे फोजदारी स्वरूपाचे असले 'तरी त्यात राजकारणी गुंतलेले असले , मत सुणवणीत अनेकदा चालढकल अधिक हात असते.लालूप्रसाद यादव अखेरीस दोषी ठरले. पण त्यांच्यावरील आरोपाची रीतसर सुनावणी व्हायला दोन दशकांचा कालखंड उलटावा लागला, दरम्यान, सत्तेत आलेल्या विविहद पक्षांनीही आपापल्या सवडीनुसार संबधित तपास संस्थांना लगाम लावले वा सैल सोडलेले होते. . राजकारणात सत्तेवर असलेले आजचे सत्ताधीश कालच्याना कोंडीत पकडण्यासाठी तपास संस्था व विविध कायदे बेछूट वापरतात.  यात नवे काहीच नाही. आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्या अग्निदिव्यातून तब्बल १२ वर्ष जावे लागले आहे. , आजचे गृहमंत्री अमित शहा यांनाही तत्कालीन ‘युपीए ‘ सरकारने विविध प्रकरणात गोवण्याचा प्रयन्त केला , ते लपून राहिलेले नाही. त्यामुळे तेव्हा कायदा काम करीत होता आणि आज सूड बुद्धीने तपास यंत्रणा वागतात, असे म्हणायला काहीही अर्थ नाही. मोदींवरील आरोपांसाठी तीनदा विशेष पथके नेमली होती . आणि केंद्रातील ‘ युपीया सरकारने त्यांना प्रोत्सहानच दिले होते. आजचे केंद्रातील भाजप व एनडीए सरकारने निरपेक्ष बुद्धीने तपास यंत्रणांना आपले काम करू देत असेल , असेही मानायचे काही कारण नाही. ‘ तळे राखी तो पाणी चाखी ‘ असे आपल्या पूर्वजांनी म्हणे आहे. त्याचीच प्रचिती अशी येत असते आताही एक घटना येथे मुद्दाम कथन केली पाहिजे. महिनाभर आधी महाराष्ट्रात राजकीय सत्ता स्थापनेचा संघर्ष चालू होता. आणि त्याचदरम्यान सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल एके सकाळी नितीन गडकरी यांच्या घरी पोहोचले. त्याची भेट महाराष्ट्रातील सरकार स्थापनेशी सबंधित असल्याच्या अनेक वावड्या निघाल्या होत्या. पण खुद्द पटेल यांनी त्याचा साफ इन्कार केलेला होता. तसे करताना त्यांनी करताना दिलेले कारण तं तकलादू होते. गुजरातच्या कुठल्या हायवेवर खूप अपघात होतात, म्हणून आपण गडकरींचे लक्ष वेधायला गेल्याचे पटेल यांनी पत्रकार परिषदेला सांगितले. खरतर इतके मोठे नेते फालतू कारणासाठी घरी जाऊन भेट घेत  म्हणूनच त्या भेटीला काही राजकीय संदर्भ नक्की होता. चिदम्बरम याना मुक्त करण्यासाठी वा दिलासा देण्या विषयी काही रदबदली करायला पटेल तेथे गेलेले होते. काय? काही जेष्ठ पत्रकारांनी तशी शंकाहि व्यक्त केली.ल आता महिनाभरात तशी सुटका झालेली आहे. मग, दोन्ही पक्षात किंवा नेत्यांमध्ये कुठला सौदा झाला, याला महत्व प्राप्त होते. आता चिदम्बरमना मिळालेला जमीन व पटेल - गडकरी भेट यांचा काही संबंध असेल काय. ? त्यांच्यावर असलेला पेच सैल करण्याच्या बदल्यात भाजपला व सत्ताधार्यांना कुठले काय मिळणार आहे. ? कारण , सौदा एकतर्फी नसतो, त्याचे लाभ दोन्ही बाजूना कमी -अधिक प्रमाणात मिळतात. सौदा म्हणून जमीन मिळालेला असेल, तर त्यातून भाजपला कोणता राजकीय लाभ मिळाला, त्याचा शोध द्यावा लागेल ल. तो लगेच नजरेत भरणारा नसतो. कोळोखात त्याचे पदर उलघडत असतात.

थोडे नवीन जरा जुने