“फास्टॅग “अंलबजावणीची जय्यत तयारी.

इंधन, पैसा, वेळ वाचवून प्रदूषण रोखण्यासाठी  १ डिसेंबरपासून महामार्गावरील सर्व टोल नाक्यावर फास्टॅग अनिर्वाय करण्यात आले आहे. याबाबतच्या सूचना टोक्यावरच्या एजन्सीला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाक्यावर सध्या फास्टॅगसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. 

फास्टॅग सुविधा निर्माण करून देण्यासाठी नाक्यावर विविध बँकांनी आपली केंद्र सुरु केली आहेत. मात्र सध्या एकच लेन रोख रक्कम भरणाऱ्या वाहनासाठी ठेवण्यात आल्याने बहुतांशी वाहनधारकाकडे फास स्टॅग स्टिकर नाहीत, तसेच त्यांच्यामध्ये फारसे प्रबोधन झाले नाही. त्यामुळे प्रत्यक्षात फास्टॅग सुरु होईल तेंव्हा नाक्यावरील एकाच लेनवर रोख पैसे भरण्यासाठी वाहनांची गर्दी निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.


भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बहुतांश सर्व तोल नाक्यावर फास्टॅग सुरु होणार आहे. यामुळे ये -जा करणाऱ्या लाखो वाहनांची चांगली सोय होणार आहे. या वाहनाचे इंधन, वेळ , आणि पैसे यांची बचत होणार आहे आणि प्रदूषण देखील घटणार आहे. यासाठी रोख रक्कम देऊन टोल भरण्याऐवजी फास्टॅग प्रणालीने टोल भरणा केला जाणार आहे” मात्र एकच लेन रोखीने पैसे घेण्यासाठी ठेवण्यात आली असून नाक्यावर वाहनाच्या रांगाच - रांगा लागण्याची शक्यता देखील आहे.  नंतर हि मुदत वाढवण्यात येईल , असे मतदेखील टोल नाक्यावरील कर्मचारी, अधिकारी, यांच्याकडून व्यक्त केले जात आहे. 

महाराष्ट्र - कर्नाटक राज्याच्या सीमेवर कोगनोळी येथील टोल नाक्यावर सध्या बारा लेन आहेत. त्यातील जाणारी एक आणि येणारी एक अशा एकाच लेन वर रोखीने पैसे भरण्याची सुविधा निर्माण करण्यात आली. उर्वरित सर्व लेन फास्टॅग साठी निश्चित करण्यात आल्या आहेत. या नाक्यावर फास्टॅगच्या स्टिकर साठी ‘ आयसीआयसीआय ‘ या बँकेने केंद्रे देखील सुरु केले.  या नाक्यावरून जाणारी रोजची वाहने अंदाजे १५ ते १६ हजार दरम्यान आहेत. सोमवार आणि मंगळवारी वाहनांची संख्या जरा कमी असते. २५ ते २६ विविध प्रकारच्या सरकारी वाहनांना सवलती आहेत. दरम्यान, फास्टॅग सुविधा घेणारे सध्या ३० ते ३५ टक्केच वाहनधारक आहेत. इतर वाहनांनी हि सेवा घेतली नाही. त्यामुळे टोल नाक्यावरील एक लेन वगळता सर्व लेन फास्टॅगसाठी ठेवण्यात आल्यामुळे एका लेनवरून पैसे भरून पुढे जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी होणार आहे. वाहनांच्या रांगा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 
थोडे नवीन जरा जुने