गोवा : “ पार्टिकल्स “ ला सुवर्ण मयूरपणजी : 
पणजी येते आयोजित सुवर्ण महोत्सवी आंतरराष्ट्रीय चित्रपट [इफ्फि ] प्रतिष्ठेचा सुवर्ण मयूर पुरस्कार स्विझर्लंडच्या ‘पार्टिकल्स ‘ या ब्लेस हॉरिसन दिगदर्शित चित्रपटाला लाभले . यंदाच्या ‘ आयसिफटी-युनेस्को गांधी ‘ पदक रिकार्डो साल्वेटी दिग्दर्शित ‘रवांडा ‘ या इटालियन चित्रपटाला मिळाले. 
५० व्या इफ्फिचा शानदार समारोप सोहळा बांबोळी येथील डॉ . श्यामप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर बुधवारी पार पडला. या सोहळ्यात अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले. 
सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा दिगदर्शन आणि निर्मिती या दोन्हीसाठी मिळून ४० लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे स्वरूप असलेला सुवर्ण मयूर पुरस्कार ‘ पार्टिकल्स ‘ चे दिग्दर्शक ब्लेस हॅरिसन व निर्माते इस्टेले फिरलोन याना मुख्यमंत्री डॉ . प्रमोद सावंत, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे , ज्युरी पॅनेलचे प्रमुख जॉन बॅली यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. 
केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री बाबूल सुप्रियो आणि सचिव अमित खरे यांच्याहस्ते ‘आयसीएफटी-युनोस्को  गांधी ‘ पदक साल्वेटी दिग्दर्शक ‘ रवांडा ‘ या इटालियन चित्रपटाला प्रदान करण्यात आले. ह्यात एकूण १२ देशातील चित्रपटाचा समावेश आहे. 
यंदाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात १५ चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. इफ्फितील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार ‘जल्लीकट्ट ‘या मल्याळम चित्रपटाचे दिग्दर्शक लिजो पेलीसी याना केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री बाबुला सुप्रियो , दिग्दर्शित रोहित शेट्टी , ज्युरी सदस्य  रमेश सिप्पी यांच्याहस्ते देण्यात आला . रुपये १५ लाख रोख, रजत मयूर व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 
ब्राझिलीयन ‘मैरीगेला ‘ चित्रपटात नायकाची भूमिका साकारणाऱ्या सेऊ जॉर्ज या अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा रजत मयूर आणि दहा लाख रुपयांचा पारितोषिकाने मुख्य सचिव परिमल राय , निर्माते सुभाष घई , ज्युरी सदस्य यांग यांच्या हस्ते गौरवण्यात आले. 

सर्वोत्कृष्ट अभिनेतासाठीचा रजत मयूर आणि दहा लाख रुपयांचा पारितोषिकाने ‘ माई घाट,नं . तो /२००५’ या चित्रपटातील भूमिकेबद्दल उषा जाधव यांना गौरवण्यात आले. जाधव यांनी हा पुरस्कार सचिव अमित खरे यांच्याकडून स्वीकारला. 
विशेष ज्युरी पुरस्कार भारतीय चित्रपट ‘ हेल्लारो ‘ ;या देण्यात आला. दिग्दर्शक अभिषेक शहा यांना १५ लाख रु. रोख, रजत मयूर आणि प्रमाणपत्र खासदार रवीकिसन व ज्युरी सदस्य राहुल रैवल यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. 
पदार्पणात उत्कृष्ट दिगदर्शकाचा रजत मयूर १० लाख रोख आणि प्रमाणपत्र हा पुरस्कार चीनच्या ‘बलून ‘ चित्रपटाच्या दिगदर्शिका पेमा त्सदेन याना मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई मुक्या सचिव परिमल राय यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला. पदार्पणात उत्कृष्ट चित्रपट ‘ मॉन्स्टर ‘ आणि ‘ अबू लैला ‘याना पुरस्कार विभागून देनाय्त आला. 
सुवर्ण महोत्सवी इफ्फिच्या यशस्वी आयोजननासाठी ‘ इफ्फि -गोवा ‘ ला ‘ आयसीएफटी-युनेस्को ‘ पुरस्कार सचिव अमित खरे आणि फिल्म संचालनालयाचे संचालक चेतन्य प्रसाद यांनी स्वीकारला 
 आयसीएफटी-युनेस्को विशेष उललेख पुरस्कार ‘ बहात्तर हुरे ‘ या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय पुरन सिंग याना मिळाला. विविध सांस्कृतिक क्षेत्रात दिमाखदार कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना राज्यपाल सत्यपाल मलिक, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, खासदार रवी किसन यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये ,प्रसिद्ध दाक्षिणात्य संगीतकार इलायराजा , ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा , अभिनेते अरविंद स्वामी, अनुपम पवनकुमार आणि बुर्जू महाराज याचा समावेश होता. 
सोहळ्याचे सूत्र संचालन सोनाली कुलकर्णी आणि कुणाल कपूर यांनी केले. अकादमीत ‘मार्घ हर मदर ‘ या चित्रपटाच्या प्रदर्शनाने इफफीचा समारोप झाला. 


थोडे नवीन जरा जुने