महाराष्ट्रानंतर आता “ गोव्यात “ नक्कीच राजकीय भूकंप

महाराष्ट्रानंतर आता गोव्यामध्ये नक्कीच राजकीय भूकंप होईल, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज, शुक्रवारी केला. महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आल्यानंतर ,गोव्यातील गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि माझी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांच्यासह काही आमदारांनी संजय राऊत यांची भेट घेतली.त्यानंतर संजय राऊत यांनी गोव्यात नक्कीच राजकीय भूकंप होईल, असा दावा केला. 
महाराष्ट्रात जसे घडलाय तसे नवीन समीकरण गोव्यात आकार धरू लागलाय. शिवसेना आणि गोवा फॉरवर्ड यांची गोव्यात युती होती आहे. याबाबत गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई आणि महाराष्ट्वादी गोमंतक [मगो] सुदिन ढवळीकर यांच्याशी बोलणं झालं आहे. त्यामुळे लवकरच गोव्यात राजकयत चमत्कार दिसेल , असे राऊत म्हणाले. 
महाराष्ट्रात जसे शिवसेना सरकार विराजमन आहे त्याप्रमाणे गोव्यातदेखील शिवसेनेची लाट येईल, असा विश्वास शिवसेना गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी नुकताच व्यक्त केला आहे. 


महाराष्ट्रात बहुमत नसताना देखील भाजप सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात आला . यावरून भाजपचे दुटप्पी राजकारण समोर आले. भाजपने असे करून एकप्रकारे जनादेशचा अपमान केला. गोव्यात देखील भाजपकडून असेच राजकारण करण्यात आले होते, अशी टीका त्यांनी केली होती. 

या आधी गोव्यात चंद्रकांत [बाबु] कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली एकूण दहा आमदार काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये गेले. त्यानंतर विजय सरदेसाई यांच्यासह गोवा फॉरवर्डच्या मंत्र्यांना आणि अपक्ष रोहन खवटे याना मंत्रिमंडळातून डच्चू दिला होता. आणि तेव्हापासून विजय सरदेसाई आणि भाजपचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यात राजकीय संघर्ष वाढला आहे. त्यांचे  रोज एकमेकांवर टीकास्त्र सुरु असते. 
थोडे नवीन जरा जुने