पिस्तुलाच्या धाकाने १ कोटीचे सोने लुटले

सोनेतारण कर्ज देणाऱ्या कंपनीच्या कार्यालयावर दरोडा 
पुणे  : 
पुणे -नगर रोडवरील चंदननगर या वर्दळीच्या परिसरात असलेल्या ‘आयएफएल गोल्ड लोन ‘ या सोन्याच्या तारणावर कर्ज देणाऱ्या कंपनीच्या कार्यालयावर गुरुवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास पिस्तुल धारी चोरटयांनी दरोडा टाकला. सोने तारण ठेवण्याच्या बहाण्याने हे दरोडेखोर कार्यालयात शिरले होते.त्यानी पिस्तुलाचा धाकाने ग्राहकांनि तारण  ठेवलेले कार्यालयातील सुमारे १ कोटीचे सोने चोरून अंदाज आहे गेल्या पंधरा दिवसात शहरात भर दिवसा घडलेली हि अशा प्रकारची दुसरी घटना आहे. त्यामुळे सराफी व्यावसायिक व व्यापारी वर्गात दहशद पसरली आहे. 
चंदननगर परिसरातील भाजी मार्केटजवळ , मेडिपॉईंट हॉस्पिटलशेजारी आनंद एम्पयार नावाची बहुमजली इमारत आहे. या इमारतीत तळमजल्यावर लिननकिंग दुकानाच्याखाली ‘आयएफएल गोल्ड लोक या कंपनीचे कार्यालय आहे नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजता हे कार्यालय उघडन्यास आले. दोन महिला व एक पुरुष कर्मचारी कार्यालयात आपापल्या कामामध्ये व्यस्त होते. साधारण पावणे अकराच्या सुमारास सोने तारण ठेवण्याच्या बहाण्याने ४ ते ५ जण कार्यालयात आले . त्यातील एकजण बाहेरच थांबला.  इतरांनी आतील कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जबरदस्तीने तिजोरीतील सोने बाहेर काढण्यास सांगितले हे सोने आपल्याकडील बॅग मध्ये भरून चोरटयांनी पोबारा केला. विविध ग्राहकांनी तारणापोटी कंपनी कार्यालयात ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची सीलबंद तब्बल १२० पाकिटे या चोरटयांनी लुटली. चोरीस गेलेल्या सोन्याची किंमत अंदाजे जवळपास १ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी चंदननगर पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली.   
  • पंधरा दिवसात दुसरी घटना. 
कोथरूड येथील पेठे ज्वेलर्सवर पंधरा दिवसापूर्वीच दुचाकीवर आलेल्या दोघांनी सायंकाळी पाचच्या सुमारास पिस्तुलाचा धाक दाखवत तब्बल दहा लाख एकोणीस हजार रुपये किमतीचे दागिने लुटले होते. यावेळी एका आरोपीने दुकानांमध्ये गोळीबार देखील केला होता.  

थोडे नवीन जरा जुने