पुन्हा पाय घसरून पडलं तर मोडून पडाल : शिवसेना

पुन्हा पाय घसरून पडलं तर मोडून पडाल : शिवसेना 
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने शिल्पकार , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या मोदीभेटीबाबत केलेल्या गौप्यस्फोटाचा धागा पकडण्यात शिवसेनेच्या ‘ सामना ‘ या अग्रलेखनातून पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. ‘ पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केले असे निवडणूक प्रचारात अमित शहा सांगत होते. हि शंका  अमित शहा याना असेल तर मग कोणत्या अनुभवाचा फायदा मोदी याना अपेक्षित होता.? पवार यांचा अनुभव देशासाठी कामी यावा यासाठी मोदी- शहा याना साडेपाच वर्ष का लागली ? पवार यांच्या अनुभवाचा मोरंबा महाराष्ट्र चाखत असून या वेळी दिल्लीश्वरांना तो चाखता आला नाही. अजित पवारांचा पापडही त्यांना भाजता आला नाही. ‘ असा टोला लगावत , शेठ , काय हे । हा महाराष्ट्र आहे. पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल. असा इशारा देण्यात आला आहे. 
शिवसेना पाठीत खंजीर खुपसण्याचे नाट्य ‘ 
शिसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये किंवा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊ नये यासाठी पडद्यामागे जे भव्य नेपथ्य आणि दिग्दर्शन सुरु होते ते नाट्य शरद पवार यांनी समोर आणल्याचे सांगत सामानाच्या अग्रलेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली ऑफर पवार यांनी धुडकावून लावली काही झाले तरी शिवशेनेशी नाते तोडायचेच असाच अर्थ असल्याचे अग्रलेखात म्हंटले आहे. भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व हे कुचकामाचे हिंदुत्व आहे. शिवसेनेला वाकवायचे , वाकले नाही तर दूर ढकलायचे हे धोरण आधीच ठरले होते. शिसेनेच्या पाठीत खंजीर खुपसायचे नाट्य तयारच होते. असे सांगत त्यासाठी शरद पवार यांच्या अनुभवाचा फायदा देशाला करून घेणार्यांनी हि उपरती आधी का झाली नाही, असा सवालही उपस्थित करण्यात आला. 
उद्धव ठाकरे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. : पवार 
विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापन करण्याची भ्रष्ट तयारी जनता पक्षाची होती आणि हा अनुभव देशाची जनता नव्याने घेत आहे. असेही अग्रलेखात म्हंटले आहे. साम , दाम , दंड , भेदाच्या पलीकडे काहीतरी चालले आहे आणि त्यांनी स्फोट पवार यांनी केला तसा स्वतत्र बाण्याचे उद्योगपती राहुल बजाज यांनी केला. तुमच्या राज्यात मोकळेपानाने बोलायचे , मोकळे पानाने जगण्याचे स्वतत्र राहिले नाही, असे राहुल बजाज यांनी देशाच्या गृहराज्यमंत्रीना तोंडावर सांगितलं असे सांगत शिवसेनेने स्वाभिमान दाखवला ,पवार यांनी दबाव झुगारला आणि राहुल बजाज यांनी भय व झुडीचे शास्त्र सांगितले आणि हि हिमतची कामे महाराष्ट्रात झाली आहेत असे या अग्रलेखात म्हणटले आहे. 
अग्रलेखात आणखी काय म्हणटले आहे. 
< मर्जीतील उद्योगपती आणि दलालासाठी महाराष्ट्राला चरकात टाकून पिळण्याचे काम सुरु होते. …. हे पिळणे उद्धव ठाकरे यांनी थांबवले. 
< असे अनुभव पुढेही येतील, दिल्लीने सवय ठेवली पाहिजे. 
<शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ द्यायचा नाही हा त्यांचा ‘कावा ‘ होता. 
< राज्यात शिवरायांच्या विचारांचे राज्य येऊ नये हे त्यांचे ध्येय होते. 
थोडे नवीन जरा जुने