न्या. लोया मृत्यूप्रकरण उकरून काढणार

न्या.लोया मृत्यूप्रकरण उकरून काढणार 
शरद पवारांच्या वक्तव्याने भाजपमध्ये चिंता
नवी दिल्ली : 
तीन पक्षाच्या आघडीचे सरकार स्थापन करण्याच्या करामतीद्वारे  शरद पवार हे किंगमेकर ठरलेले आहेत.उद्धव ठाकरेच्या डोक्यावर त्याचंच आग्रहातून मुख्यमंत्री पदाचा ताजहि आलेला आहे . त्यामुळे आपल्या मनात जी काही खडखड आहे. ती  सगळी ठाकरेंचं आडुन शमविण्याचे सारे हथकढे त्यांच्याकडून आता आजमावले जातील. ठाकरे सरकार आता मुंबईतील न्या. ब्रिजगोपाल हरकिशन लोया यांच्या संशयास्पद मृत्यूची फाईल पुन्हा ‘ ओपन ‘ करणार आहेत. 
न्या. लोया हे गुजरातमधील सोहराबुद्धीनं शेख एन्काउंटर प्रकरण सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायमूत्री म्हणून हाताळत असताना १ डिसेंबर २०१४ रोजी त्यांचा अनपेक्षित व संशयास्पद मृत्यू झाला होता. पवारांनी याबाबत एका मुलाखतीत म्हटलेले आहे कि,          सत्य बाहेर यावे म्हणून जर तशी गरज भासली आणि मागणी करण्यात आली, तर न्या. लोया मृत्यूप्रकरणाची पुन्हा चौकशी केली जाऊ शकते. 
भाजपचे अध्यक्ष तसेच केंद्रीय मंत्री अमित शहा हे सोहराबुद्धीनं प्रकरणातील एक संशयित आरोपी होते. लोया यांच्या मृत्यूनंतर अमित शहा याना कोठडीतून मुक्त केले होते. 
न्या लोया मृत्यूप्रकरणी चॊकशीची मागणी एप्रिलमध्ये तसेच पुढे जुलै २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. ह्दयविकाराने त्यांचा मृत्यू झाला असे अधिकृतपणे समोर आल्यानंतर उगीचच न्याययंत्रणेचा वेळ खर्ची घालण्याचे कारण नाही , असे न्यायालयाने स्प्ष्ट केले होते. अमित शहा यांनी गृहमंत्री म्हणूनहि शिवसेनेचे सरकार महाराष्ट्रात स्थापन होऊ नये म्हणून अखेरीच्या क्षणापर्यंत जीव तोडून प्रयन्त केला. यामागे राजकारणापलीकडे बरेच काही होते. आणि या बऱ्याच गोष्टीत सर्वात महत्वाचे हेच होते कि, न्या.ल लोया मृत्यू प्रकरण पुन्हा उकरून काढले जाईल आणि त्यांना [ शहा याना ] अडचणीत आणण्याचा प्रयत्न नव्या सरकारकडून केला जाईल. 

फडणवीस यांनी एका मुलाखतीत पवारांचा काळ महाराष्ट्रातून आता संपलेला आहे, असे व्यक्तव्य केले होते. पवार य वकव्याने कमालीचे दुखावलेले आहेत. फडणवीस याना सत्तेचा दर्प आला आहे. ठाकरे यांच्या नेतृत्वखाली सरकरने सुडाचे राजकारण करणार नाही. असे  म्हटले आहे, पण राजकारणात म्हणायला काय जाते भाजप गोटात चिंतेचे सावट आहेच. 
थोडे नवीन जरा जुने