बहुमत सिद्ध झाले पण: सर्व मंत्री खात्याविणाच ।

बहुमत सिद्ध झाले पण: सर्व मंत्री खात्याविणाच । 
मुंबई : शिवसेना, काँग्रेस व राष्टवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन चार दिवस झाले , त्रयी सहा मंत्र्यांचे खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे हे सहा मंत्र्यांचे खातेवाटप झालेले नाही . त्यामुळे हे सहा मंत्री बिनखात्याचे आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार व खातेवाटप लटकल्याने सरकारच्या कारभाराला गती मिळण्यास मर्यादा निर्माण झाली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते दिल्लीत जाऊन आले तेथे त्यांच्या बैठकही झाल्या, पण हिवाळी अधिवेशनांतरचा विस्ताराचा मुहूर्त लागेना, असे संगितिलें हात आहे. शिवसेनेच्या कोट्यातून कोणाला मंत्रीपदे द्यायची, याची यादी तयार असली, तर दोन्ही काँग्रेसच्या नावावर आणि खात्यांवर एकमत झाले नसल्याचे समजते. 
राष्ट्रवादीच्या अजित पवार याना उपमुख्यमंत्री केले जाणार आहे. मात्र, विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार करावा, अशी इच्छा शरद पवार यांनी व्यक्त केल्याचे व्यक्त केल्याचे  समजते.हे अधिवेशन १६ ते २१ डिसेंबर या काळात आहे. पुढे नाताळच्या सुट्ट्या आल्या आहेत . नंतर लोक ३१ डिसेंबरच्या मूड मध्ये असतील. 
त्यामुळे सरकार स्थापन होऊन महिना झाला, तरीही मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटप होत नसल्याचा संदेश जाईल, ते काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत निदर्शनास आणून दिले. शिवाय अधिवेशन सहा मंत्र्यांना घेऊन कसे चालवायचे , असाही सवाल आहे. मात्र, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी १९७८ साली नि एकटाच मुख्यमंत्री झालो होतो व  अधिवेशनाला सामोरे गेलो होतो. असे उत्तर दिल्याने काँग्रेस गप्प बसले.
राज्यातील शेतकऱ्यांनी कर्ज माफी द्यायची असेल, तर एखाद्या मंत्री या मंत्रिगटावर त्याची जबाबदारी देऊन सारी माहिती मागवावी लागेल, पण मंत्र्यांकडे खाते नसल्याने त्यांना कसलेच काम करणे शक्य नाही. अजित पवार मंत्रिमंडळात सहभागी होईपर्यंत कर्जमाफीची घोषणा करू नये, असा दबाव राष्ट्रवादीकडून येत असल्याचे वृत्त आहे. 
  • सर्वाना बंगले मिळाले, पण काम मात्र नाही. 
मंत्र्यांनी सरकारी निवास्थानेहि बदलून घेतली आहेत. नितीन राऊत याना ‘ चित्रकूट ‘ बंगला मिळाला. तो नको असल्याने त्यांना ‘ पर्णकुर्ती बंगला दिला असून , विधानसभा अध्यक्षनं पटोले याना ‘ चित्रकूत दिला आहे.मंत्रालयातील दालनाचेहि वाटप झाले आहे, पण आपण काम कोणते करायचे , सास प्रश्न मंत्र्यांना पडला आहे. आपण कोणत्या अधिकाऱ्यांना बोलावयाचे, कोणत्या विभागात कोणत्या बैठक घ्यायच्या, असे प्रश्न त्याच्यापुढे आहेत. 
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी बैठका सुरु केल्या आहेत, पण सर्व निर्णय अंतिम स्वाक्षरीसाठी त्यांच्याकडेच येत आहे. मंत्रिमंडळ विस्तार होईपर्यंत सहा मंत्र्यांना तरी खातेवाटप करा. त्यामुळे मंत्रालयाचा कारभार सुरु होईल, अशी मागणी तिन्ही पक्ष करीत आहेत . 

थोडे नवीन जरा जुने