मराठा आरक्षण आंदोलकांवर दाखल गुन्हे हि मागे घेणार

मराठा आरक्षण आंदोलकांवर दाखल गुन्हे हि मागे घेणार. 
मुंबई: मराठा आरक्षण आणि अन्य मागण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर गुन्हे मागे घेतले जाण्याची शक्यता आहे . बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भीमा -कोरेगाव मराठा आरक्षणाच्या आंदोलनात दाखल झालेल्या गुन्ह्यासह अन्य समाजाच्या आंदोलनातील गुन्हे हि मागे घेण्यासंबंधी एकत्रित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले . 
मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडच्या विरोधात आंदोलन करणारे पर्यावरणप्रेमी आणि नानार प्रकल्पा विरोधात आंदोलन करणाऱ्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी मंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या.लाल दलित समाज तीनही हि मागणी जोर धरत आहे. एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली.ल 
मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसह अन्य मागण्यासाठी राज्यात लाखोंचे मोर्चे काढले . या मोर्चात मराठा समाजाने अत्यंत शांतपणे सहभागी झाला होता. मात्र, त्यानंतर मागणी मान्य होत नसल्याचे मराठा समाजाने आक्रमक आंदोलन केले. त्यामध्ये काही समाजकंठक असले, तरी अनेक निरपराध मराठा तरुणावर गुन्हे दाखल करण्यात आपले. या आंदोलनात ज्याच्यावर गुन्हे दाखल झाले ते बहुतांशी तरुण 
गंभीर गुन्हे मागे घेण्यास पोलिसांचा विरोध. 
मराठा आंदोलकांवर एकूण ५०६ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी १७० गुन्हे हे पोलीस ठाण्याच्या स्तरावर तपासणी करून मागे घेण्यात आले. २८८ गुन्हे हे राज्य स्तरावर माहे घेणयात आले आहेत. काही गुन्ह्याचे प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर झालेले नाहीत. तर ३५ गुन्ह्यामध्ये पोलिसांच्या गाड्या जाळणे, पोलिसांवर हल्ला , जाळपोळ, व हिंसाचार करणे. असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे मागे घेण्यास पोलिसांचा विरोध आहे. ज्या गुन्ह्यात पाच लाखापर्यंत नुकसान झाले असेल , त्याची भरपाई केली तर असे गुन्हे मागे घेण्यात येतील. हि मर्यादा १० लाख़ांपर्यंत करण्यात आली. राज्य सरकारला गुन्हे मागे घेण्यासाठी हि नुकसानभरपाई माफ करावी लागणार आहे. 

थोडे नवीन जरा जुने