१ लिटर दुधात चक्क १ बादली पाणी घालून ते ८१ विद्यार्थ्याना वाटले

सोनभद्र [ उत्तर प्रदेश ] : 
उत्तर प्रदेशमधील सोनभद्र जिल्ह्यातील आदिवासी भागातील एका प्राथमिक विद्यालयात मध्यान्ह आहारात [ मीड डे मील ] भेसळ , भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 
उत्तरप्रदेशात सरकारकडून मध्यान्ह आहार म्हणून विद्यार्थ्याना दूध आणि खिचडी दिले जाते मात्र सोनभद्र जिल्ह्यात कोटा गावातील सलाई बनवा प्राथमिक विद्यालयातील अधिकाऱ्याने माध्यान्ह आहाराच्या नावाखाली एक लिटर दुधात एक बादली पाणी मिसळल्याचे प्रकरण उघड झाले. हेच पाणी मिक्स केलेले दूध ८१ विध्यार्थाना दिले. हे प्रकरण समोर येताच विद्यालयाकडून आतून अंग काढण्याचा प्रयन्त झाला. यानंतर गट शिक्षण अधिकाऱ्यांनी याविषयी तक्रार आल्याचे सांगितले . चौकशीनंतर कारवाई करण्यात येईल, असे गट शिक्षण अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. 
या विद्यालयात १७१ विद्यार्थी शिक्षण घेतात . २७ नोव्हेंबर ला यापैकी ८१ विद्यार्थी हजर होते. त्यावेळेस हा प्रकार घडला आहे. 


सोनभद्रामधील स्वराज अभियानातील राज्य समितीचे सदस्य दिनकर कपूर यांनी यांनी सांगितले कि, सोनभद्र जिल्ह्यातील शाळेत दिला जाणारा माध्यान्ह आहार इतर राज्यातील अन्य जिल्ह्याच्या तुलनेने निकृष्ट असतो. नीती आयोगाच्या आकडेवारी नुसार या जिल्यात ५६ टक्के लोक हे कुपोषणग्रस्त आहेत. यात ५ वर्षाच्या खालच्या वयोगटातील संख्या ७० टक्के आहे. सोनभद्रामधील प्राथमिक विद्यालयात खिचडी नावाखाली तांदूळ गरम पाण्यात उकळून देतात . त्यामध्ये कोणत्याच भाज्यांचा वापर केला जात नसल्याचे त्यांनी सांगितले. 

या प्रकरणी दोषीच्या विरोधी कारवाई करण्यात येईल, असे सहाय्यक पायाभूत शिक्षण अधिकाऱ्याकडून सांगितले आहे. 
थोडे नवीन जरा जुने