रात्री - अपरात्री उठून खाता

रात्री - अपरात्री उठून खाता ? हा आजार असू शकतो 
तुम्हाला रात्री-अपरात्री उठून खाण्याची सवय आहे. ? रात्री जाग येते तेव्हा तुम्हाला काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं  ? तर मग तुम्हाला ‘ नाईट इटिंग सिंड्रोम ‘ असू शकतो . नाईट इटिग सिंड्रोम काय असतो ? आणि तो कशाप्रकारे तुम्ही आटोक्यात आणू शकता. 
नाईट इटिंग सिड्रोम म्हणजे काय ?
रात्रीचे जेवण केल्यावरही मध्यरात्री जाग आल्यावर भूक लागण आणि ठराविक काळानंतर त्यांचं सवयीत रूपांतर होणं, याला ‘ नाईट इटिग सिंड्रोम ‘ असे म्हणतात . 
  •  वेळीच लक्ष देणं गरजेचं  
हल्लीच्या बदलेल्या जीवनशैलीत यावेळी खाणार्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बऱ्याचदा भूक नसतानाही केवळ सवय म्हणून काही व्यक्ती मध्यरात्री उठून कटात. असं रात्री अपरात्री उठून झालेल्या अन्नाचं पचन न होता त्याच रूपांतर थेट कॅलरीमध्ये होऊ शकत . आरोग्य तज्ञांच्या मते,    यावेळी आणि मध्यरात्री उठून खान हे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकत . थोड्या काळासाठी गरज म्हणून खात असाल, तर त्याच रूपांतर सवयींमध्ये होऊन न देणं , हे सर्वस्वी तुमचंच हातात आहे. अशा वेळी आहारतज्ञाचा सल्ला घेणं गरजेचं असत कारण मध्यरात्री भूक लागण्यामागे शारीरिक किंवा मानसिक कारण असू शकतात. जसं कि, मधुमेहाचे रुग्ण असणं , झोपेच्या अनियमित वेळा आणि झोपेसंबंधित आजार असणं , शर्करा कमी होणं, मानसिक तणाव असणं , शरीरातील संप्रेरकांचं प्रमाण बदलणं इत्यादी . वरील सर्व गोष्टी ‘ नाईट इटिंग सिंड्रोम ‘ होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात . 
मध्यरात्री उठून खाण्याचे दुष्परिणाम 
  • अपचनामुळे पोटात गॅस होणं, जुलाब होणं, बद्धकोष्ठता 
  • शरीरातील अतिरिक्त चरबीचं प्रमाण वाढणं 
  • वजन आटोक्याच्या बाहेर गेल्यानं हृदयविकाराचा धोका वाढणं 
  • मध्यरात्री खाल्यानंतर दात स्वच्छ न केल्यास दातांच्या समस्या उध्दभवन . 
  • रक्तातील अतिरिक्त शर्करा वाढणं
* बदलत्या सवयी टाळण्यासाठी काय कराल ? 
बदलत्या जीवनशैलीमुळे तुम्हाला तुमचं आरोग्य जपायचं असेल, तर तुम्हाला सर्वप्रथम योग्य वेळी जेवायची सवय लावून घ्याला हवी. डॉक्टरांच्या मते, उठून खाणाऱ्या व्यक्तीपैकी बरेच लोक हे भुकेपेक्षा जास्त सवयीचे शिकार असतात. हे सर्व टाळण्यासाठी सर्व प्रथम भुकेचा गणित तुम्हाला सांभाळायला हवं. रात्रीच्या जेवणात आणि सकाळच्या न्याहारीत योग्य अंतर ठेवा. यासोबत तुमच्या रात्रीच्या जेवणात योग्य कर्बोदके आणि प्रथिनेचं प्रमाण योग्य ठेवा. जेणेकरून तुमच्या शरीरातील  कॅलरीची आणि शर्करेची पातळी योग्य राहून मध्यरात्री भूक लागण्याची शक्यता कमी होण्यास मदत होईल. रात्रपाळी करणाऱ्या व्यक्तींनी सामोसा, वेफर्स यांसारखे तेलकट पदार्थ न खाता गरयुक्त फळं किंवा फळांचा ज्यूस केल्यास शरीराला अन्य कशाचीच आवश्यकता भासणार नाही. तसेच यामुळे पोटाच्या समस्याहि उद्भवणार नाहीत शिवाय धुम्रपान आणि मद्यपानाची सवय असणाऱ्यांना हा आजार वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यांनी वेळीच हि सवय आटोक्यात आणण आवश्यक आहे. 



****
रात्री अपरात्री भूक लागणाऱ्या व्यक्तीनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे, कारण हि सवय तुमच्या आरोग्याला घातक ठरू शकते. व्यग्र वेळापत्रकात स्वतःच्या आरोग्याकरिता वेळ राखून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच , तुमच्या शरीराला प्रथिन आणि ऊर्जा पुरवणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा. पुरेशी झोप घ्या. 


-डॉ . जयेश लेले, फिजिशियन   




थोडे नवीन जरा जुने