१ जून पासून ‘एक राष्ट्र ‘ एक रेशन कार्ड योजना लागू ।

१ जून पासून ‘एक राष्ट्र ‘ एक रेशन कार्ड  योजना लागू । 
नवी दिल्ली  : 
आगामी वर्षात १ जूनपासून ‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड ‘ हि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील महत्वाकांक्षी योजना लागू होणार आहे. कुठेही काढलेल्या रेशन कार्ड वर देशभरात कुठेही स्वस्त धान्य उपलब्ध होऊ शकनार आहे.  
  याआधी ज्या प्रभागातून अथवा पंचायतीतून रेशन कार्ड काढलेले आहे, त्या भागातील रेशन दुकानातच स्वस्त धान्याची खरेदी यायची . 
  यासंदर्भात मंगळवारी लोकसभेत प्रश्नकाळामध्ये उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी हि माहिती दिली. 
सध्या आंध्र-प्रदेश , हरियाणासह काही राज्यामध्ये १०० %रेशन दुकानावरून पीओएस यंत्रणा उपलब्ध झालेली आहे. ‘एक राष्ट्र , एक रेशन कार्ड ‘ योजना लागू करण्यासाठी सर्वच दुकानांवर पीओएस यंत्रणा बसवावी लागेल.  
सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीच्या एकात्मिक व्यवस्थापनांतर्गत [ आयमपीडीएस  इंडिग्रेटेड मॅनॅजमेण्ट ऑफ पीडीएस ] काही राज्यातून कुठल्याही जिल्ह्यात रेशन खरेदी साठी सध्याच शक्य झालेली आहे. आंध्रप्रदेश , गुजरात, हरियाणा,केरळ, झारखंड, महाराष्ट्र,राजस्थान ,तेलंगणा आणि त्रिपुराचा यात समावेश आहे. 

  • या योजनेचे फायदे 
  • सर्वसामान्यांना या योजनेचा लाभ होईल. एखाद्या विशिष्ट रेशन दुकानांवर लोक अवलंबून राहणार नाहीत. 
  • कुठल्याही सरकारमान्य रेशन दुकानातून ते खरेदी करू शकतील. वैशिष्ट्य दुकानमालकावर अवलंबुन राहण्याची गरज उतरणार नाही. 
  • रेशन कार्डला आधार क्रमांक जोडल्याने घोटाळ्यांना आला बसेल. 
  • नोकरी , रोजगारासाठी स्थलांतर करणाऱ्या लोकांना या योजनेचा सर्वाधिक लाभ होईल. 
  • कुणी बिहारचा व्यक्ती दिल्लीमध्ये नोकरीनिमित्त आला, तर बिहारच्या कार्डवर दिल्लीत धान्य मिळेल.
  • कुणी बिहारचा व्यक्ती दिल्लीमध्ये नोकरीनिमित्त आला, तर त्याला बिहारच्या कार्डावर दिल्लीत धान्य मिळेल.  
थोडे नवीन जरा जुने