कांदा : @ १४०

कांदा : @ १४० 
नवी मुंबई : 
एपीएमसी घाऊक कांदा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी कांद्याचे दर चढे राहिले. सोमवारी ११० रुपये किलो असणारा कांदा मंगळवारी १० रुपयांनी वाढून १२० रुपये किलोवर पोहोचला. किरकोळ बाजारात हाच कांदा १२५ रुपये किलोवरून १३५ ते १४० रुपयांवर पोहोचला . रोज भडकत चाललेला हा कांदा डोळ्यात  आणू लागला आहे. हि दरवाढ आणखी आठवडाभर सुरु असे घाऊक व्यापाऱ्यांनी सांगितले. 
एपीएमसी घाऊक बाजारात सोमवारी ९५ ते ११० रुपये किलो असणारा कांदा मंगळवारी ९० ते १२० रुपये किलोपर्यंत पोहोचला. हा दर या वर्षातील उच्चाकी ठरला आहे. 
घाऊक बाजारात सध्या अनेक ठिकाणाहून नवीन कांदा बाजारात येत आहे. . पण या कांद्याची आवक कमीच आहे. शंभर सव्वाशे गाड्याच्या जागी केवळ ६० ते ७० गाड्यांची आवक होत असल्याने बाजारात कांद्याची कमतरता आहे. मागणी नेहमीसारखी प्रचंड आणि पुरवठा मात्र कमी यातून कांद्याची महागाई सुरु झाली आहे. बाजारात नवीन कांदा येत नाही आणि कांद्याची आवक वाढत नसल्याने दर उतरण्याची शक्यता कमी असल्याचे व्यापाऱ्याचे म्हणने आहे.  

  • कांदा १३५ - १४० वर पोहोचला आणि तो आणखीन वाढण्याची चिन्हे असल्याने याचा थेट फटका घरच्या जेवण[पासून ते गाडीवरच्या कांदाभाजीपर्यंत झालेला दिसतो. वडापावच्या गाडीवर दिसणारी कांदाभजी काही दिवसापासून गायब झालेली दिसतात. 
  •  किरकोळ व्यापाऱ्याच्या दरवाढीवर कुणाचेच नियंत्रण नसल्याचे किरकोळ बाजारात दरवाढ मोठ्या प्रमाणात होत असल्याने ग्राहकांना चढ्या दराने कांदा खरेदी करावा लागत आहे.  
  • कांदा रडू लागला असतानाच लसूणही स्वस्त राहिलेला नाही. पंधरा दिवसापूर्वी १०० रुपये किलो दराने विकला जाणारा लसूण सध्या किरकोळ बाजारात २०० रुपये किलो दराने विकला लसूण व कांदा हे जेवणाला चव आणणारे घटक असे आवाक्याबाहेर गेले आहेत. 
  • एपीएमसी आणि किरकोळ बाजारातील व्यापाऱ्याच्या मते,किमान दोन महिने हा महागलेला कांदा खाली हा महागलेला कांदा खाली उतरण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे एक तर महागाईची किंवा कांदाच न खाण्याची सवय करून घ्यावी लागेल. 
  • पाऊस थांबल्यानंतर शेतकऱ्यांनी ८ नोव्हेंबरनंतर बी पेरले. रोपांची वाढ होण्यासाठी दीड महिना आणि त्यानंतर महिन्यांनी कांदा बाजारात येईल,तेव्हा कुठे कांद्याची आवक वाढून किमती आवाक्यात येतील. असे घाऊक व्यापारी सूरज पाटील यांनी सांगितले. 
  • नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनातं मंगळवारी काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी कांद्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. कड्याच्या वाढत्या भाववाढीबरोबरच ढासळती अर्थव्यवस्था आणि बेकारी हे विषयही विरोधकांनी रेटून धरला आहे. 
थोडे नवीन जरा जुने