हैदराबादमध्ये सामूहिक बलात्कार करून तरुणीला जाळले : पुन्हा ‘ निर्भया ‘

हैद्राबाद: बुधवारी [ ता. २७ ] रात्री तिची गाडी शहराच्या एका शांत भागात पंक्चर झाली. तिने घरी फोन करून तसे सांगितले. रात्री बराच उशीर झाल्याने घरच्यांनी तिला सुरक्षित जागी थांबण्यास सांगितले. पण गाडीसोडून तिला इतर ठिकणी जात येईना. पंक्चर काढण्यासाठी तिने आसपास कुठे गॅरेज आहे का बघितले, तेवढ्यात बाजूच्या एरिआतील काही मुलांनी तिला मदतीची विचारणा केली. आणि मदतीच्या बहाण्याने आलेल्या त्या मुलांनी मदत करायची सोडून तिची छेडछाड केली, बलात्कार केला अन ...... 
        डॉ . प्रियांका रेड्डी …. हैदराबादमधील २६ वर्षीय शिकाऊ डॉक्टर . बुधवारी रात्री बाहेरून परतत असताना हैद्राबाद शहराच्या बाहेरील बाजूस असलेल्या शादनगर परिसरात तिची गाडी बंद पडली. मदतीसाठी तिने बरीच शोधाशोध केली, मात्र हा भाग सुनंसुनं असल्याने आसपास गॅरेज दिसेना. दरम्यान तिने घरी बहिणीला शादनगर परिसरात गाडी पंक्चर झाल्याने ती अडकून पडली असल्याची माहिती दिली होती. तसेच या भागात थांबायची भीती वाटत असल्याचेही सांगितले . यावर घरच्यांनी तिला तो भाग शांत आहे, माणसांची वर्दळ कमी असते, त्यामुळे सुरक्षित ठिकाणी थांब किंवा कॅब करून घरी ये असे बजावले होते. पण गाडी सोडून न जात आल्याने ती तिथेच थांबली.  

        
        प्रियांकाची हि हालचाल बघून व मदत करण्याच्या मानाने शादनगर परिसरातील काही मुले तिला मदत करण्यासाठी तिथे आलीत . प्रियांकाच्या घरच्यांनी तिला कालांतराने फोन केला पण तिचा फोन स्वीच ऑफ लागत होता. दुसऱ्या दिवशी पहाटे तिने सांगितलेल्या जागेवर घरच्यांनी शोधाशोध सुरु केलेलं. मात्र ती संपली नाही. नंतर हैद्राबाद - बंगळूर हायवेवर तिचा जळून राख झालेला मृतदेह सापडला. तिचे कपडे व गळ्यातील गणपतीच्या लॉकेटवरून तिच्या मृदेहाची ओळख पटली. कोणीतरी तिची जाळून हत्या केल्याचे उघड झाले. 

        शादनगर पोलीस या घटनेचा शोध घेत आहेत. नक्की कोणत्या मुलांनी तिला मदत केली, त्यांनीच हे कृत्य केले का? कि कोणी  इतर केले असेल असे अनेक प्रश्न प्रियांकाच्या घरच्यांसह पोलिसांनाही पडले आहेत. काळ रात्री हि बाब उघडकीस आली व त्यानंतर पोलीस यंत्रणा सगळ्या बाजूने शोधकार्य करत आहे. हा निर्घृण घटनेचा निषेध म्हणूनट्विटर वर RIP  PriyankaReaddy हा ट्रेंड सुरु आहे. प्रियांकाच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडले जावे अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे.

थोडे नवीन जरा जुने