पुणे: मिळकतकर भरा, नाहीतर , घरासमोर वाजणार बँड

पुणे : मिळकतकर वसुलीचेउद्दिष्ट गाठण्यासाठी महापालिकेने वसुलीवर भर दिला असून, थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्याच्या घरासमोर बँड वाजविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

महापालिकेच्या उत्पन्नात हमखास भर घालणाऱ्या मिळकतकरारातून यंदा अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. मिळकतकराची थकबाकी चार हजार कोटीच्या घरात आहे. गेल्या आठवड्यात केवळ एक हजार कोटी रुपये मिळकतकरातून जमा झाले आहेत. चालू आर्थिक वर्षासाठी २ हजार १०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे.


शहरातून सुमारे ९ लाख निवासी आणि व्यावसायिक मिळकती आहेत. त्यापैकी महिनाभरात २३ हजार ६३५ मिळकतीची पाहणी करण्यात आली असून, त्यातील ११५ मिळकती ‘ सील ‘ करण्यात आल्या आहेत. मिळकतीदारांना वारंवार नोटीस देऊनही कर भरत नसल्याने तो वसूल करण्यासाठी येत आहे. पुढील चार महिने सतत हि कारवाई सुरु राहिली, अशी माहिती महापालिकेचे सहआयुक्त विलास कानडे यांनी दिली . यांनी दिली. 

“ चालू वर्षातील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पावले उचलण्यात आली, असून त्यानुसार जादा अधिकारी -कर्मचारी घेऊन तपासणी मोहीम हाती घेतली आहे. जे लोक कर भरण्यास टाळाटाळ करतात त्यांच्या घरासमोर बॅड वाजविण्यात येईल. “

  • विलास कानडे, सहआयुक्त , महापालिका  
थोडे नवीन जरा जुने