शिक्षकांच्या वेतनावर येणार टाच

शिक्षकांच्या वेतनावर येणार टाच. ? 
मुंबई :  
मराठी शाळांत विद्यार्थी कमी होत आहेत. त्यामुळे शिक्षक अतिरिक्त होत असताना आता त्याच विद्यार्थी संख्येवर शिक्षकांचे वेतन देण्याबाबत शिक्षण विभागाने बुधवारी एका परिपत्रद्वारे पटसंख्येच्या आधारे शिक्षकांचे वेतन ठरवता येईल का ? याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. यामुळे शिक्षकांच्यातून संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे. 
राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी बुधवारी एकाच दिवशी एका परिपत्रद्वारे   शिक्षणाशी संबंधित विविध विषयांच्या तब्बल ३३ समित्यांची घोषणा केली आहे. त्यात अधिकाऱयांचे गट तयार केले आहेत. याच शिक्षकांना वेतन अनुदान देण्याऐवजी प्रतिविद्यार्थी अनुदान देण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी शिक्षण सांचालक दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. सध्या संचमान्यतेनुसार शिक्षक निश्चिती करण्यात येऊन वेतन अनुदान देण्यात येते. या संदर्भात या समितीने अभ्यास करून शिक्षकांना थेट वेतन अनुदान देण्याऐवजी विध्यार्थी संख्येनुसार संस्थाचालकांना अनुदान देण्याबाबत अभ्यास करावा अशी सूचना करण्यात आली. याच बरोबर यामुळे राज्याच्या आर्थिक भारावर काही परिणाम होऊ शकतो का याचाही अभ्यास समितीने करावा असे सूचित केले आहे. 
  • ३३ अभ्यास गटाची स्थापना 
नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्रास्ताविक असलेल्या विविध संकल्पना यांच्या अंलबजावणीतील आव्हाने याचा उहापोह करण्यासाठी अभ्यास गटाची निर्मिती करण्यात आली असून , ३१ डिसेंबर पर्यंत या समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 
शिक्षण आयुक्तांनी नेमलेल्या विविध ३३ प्रश्नाच्या समित्यांमध्ये अकरावी आणि बारावीच्या अभ्यास क्रमाचा आढावा घेण्यासाठी बोर्डाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे याच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली आहे. तर संच मान्यता प्रक्रियेतील त्रुटींचा अभ्यास करून त्या दुरुस्ती बाबत सूचना करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. 
या निर्णयामुळे शिक्षकांनी स्वागत केले आहे. तर याचबरोबर मुख्याध्यापकांची भरती अनुभवानुसार नाही तर थेट सरळ सेवा भरती प्रक्रियेने करावी याबाबत विचार करण्यासाठीही समिती नेण्यात आली आहे. 

थोडे नवीन जरा जुने