विराट कोहलीची लै भारी खेळी : टीम इंडियाने मोडला दहा वर्षांपूर्वीचा विक्रम

विराट कोहलीची लै भारी खेळी : टीम इंडियाने मोडला दहा वर्षांपूर्वीचा विक्रम 
 भारत विरुद्ध वेस्ट इंडिज  यांच्यातल्या पहिल्या ट्वेन्टी -२० सामन्यात टीम इंडियाने निर्विवाद वर्चस्व गाजवलं. वेस्ट इंडिजने विजया साठी ठेवलेल्या २०८ धावांचे लक्ष टीम इंडियन ६ विकेट्स व ८ चेंडू राखून पार केलं. लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळीनंतर कर्णधार विराट कोहलीनं तुफान फटकेबाजी करताना नाबाद ९४ धाव चोपून भारताला विजय मिळून दिला या विजयासह भारतीय संघानं दहा वर्षांपूर्वीचा स्वतःच्याच नावावरील विक्रम मोडला. 
वेस्ट इंडिज प्रथम फलंदाजी करताना ५ बाद २०७ धावा केल्या. एव्हिन लुईसने १७ चेंडूत ३ चौकार व ४ षटकार खेचून ४० धावांची खेळी केली. त्यानंतर ब्रेडन किंग [ ३१] , शिमरोन हेटमायर [ ५६] आणि किरॉन पोलार्ड [ ३७ ] यांनी फटकेबाजी केली. जेसन होल्डरनंही ९ चेंडूत २४ धाव चोपल्या . युजवेंद्र चहलन एकाच शतकात दोन धक्के देत विंडीजच्या धावगतीला चाप बसवला 
त्यानंतर टीम इंडियाच्या सलामीवीर रोहित शर्मा [ ८ ] लगेच माघारी परतला. पण राहुल व विराट यांनी शतकी भागीदारी केली. राहुलने ४० चेंडूत ५ चौकार व ६ षटकार खेचून नाबाद ९४ धावा चोपल्या . भारतीय संघानं हा सामना ६ विकेट राखून जिंकला .ट्वेन्टी -२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग 
२०८ वि . वेस्ट इंडिज , हैद्राबाद २०१९ 
२०७ वि. श्रीलंका , मोहाली , २००९ 
२०२ वि. ऑस्ट्रोलिआ , राजकोट , २०१३ 
१९९ वि. इंग्लंड ,ब्रिस्टोल ,२०१८ 
१९८ वि . ऑस्ट्रेलिया ,सिडनी ,२०१६ 


ट्वेंटी - २० क्रिकेटमधील विराटची सर्वोत्तम खेळी. 
९४ * वि वेस्ट इंडिज , हैद्राबाद , २०१९ 
९० * वि ऑस्ट्रेलिया , ऍडलेड , २०१९
८९ * वि वेस्ट इंडिज , मुंबई, २०१६ 
८२ *वि ऑस्टेलिया , मोहाली , २०१६ 

८२ * वि श्रीलंका , कोलंबो , २०१७ 

थोडे नवीन जरा जुने