डोक्याची घंटा । चालू दशक ठरणार सर्वात उष्ण

डोक्याची घंटा । चालू दशक ठरणार सर्वात उष्ण 
आतापर्यंत इतिहासात २०१० चे दशक सर्वात उष्ण ठरण्याची शक्यता आहे. असे जागतिक हवामान शास्त्राने संघटनेने जाहीर केले आहे. या  वर्षी जगात सर्वत्र हवामानामध्ये बदल दिसून आले , नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढल्याकडेही लक्ष वेधण्यात येत आहे. 
२०१९ मध्ये औद्योगिक क्रांतीपूर्वी काळापेक्षा सरासरी १. १ अंश सेल्सिअस जास्त तापमान नोंदविण्यात आल्याचे जागतिक हवामान शास्त्र संघटनेने जाहीर केले आहे.
  • २०१९ हे वर्ष इतिहासातील पहिल्या तीन सर्वाधिक उष्ण वर्षांमध्ये असल्याची नोंद झाली आहे. 
  •  खनिज तेलाचे ज्वलन , पायाभूत सुविधांची उभारणी , शेतीचे प्रमाण आणि मालवाहतुक यातून होणाऱ्या उत्सर्जनामुळे २०१९ मध्ये वातावरणातील कार्बनच्या प्रमाणाचा उच्चाक होण्याची शक्यता आहे. 
  • वातावरणातील ९० % उष्णता महासागर शोषून घेत असतो , मात्र सध्या महासागराचे तापमान आतापर्यंतच्या उच्चाकी स्थितीला आहे. 
  • समुद्रातील आम्लाचे प्रमाण गेल्या १५० वर्षांपासून तुलनेत २५ %ने वाढले आहे. यामुळे, सागरी जीवसृष्टीला खुप मोठा धोका असून , अन्न व रोजगारासाठी सागरावर अवलंबुन असणाऱ्या कोट्यवधी नागरिकांना त्याचा फटका बसू शकतो. 
  • समुद्रपातळी आमलचे प्रमाण गेल्या १५० वर्षांपूर्वी च्या तुलनेत २५ %ने वाढले आहे. यामुळे, सागरी जीवसृष्टीला खूप मोठा धोका बसू शकतो. 
  • समुद्राची पातळी ऑक्टोबरमध्ये सर्वोच्च पातळीला पोहोचली होती, यातच, ग्रीनलँडमधील ३२९ अब्ज टन बर्फ गेल्या १२ महिन्यामध्ये वितळला आहे. याचा परिणाम दिसत आहे. 

  • पुढील पिढयासमोरील आव्हान 
जागतिक हवामानामध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या चार  दशकांमध्ये हा वेग वाढला असून, गेल्या चारपैकी प्रत्येक दशकांपेक्षा उष्ण असल्याची नोद आहे. त्याचा परिणाम पुढील पिढ्यांना सहन करावा लागणार आहे. 
  • आपत्ती धोका वाढला 
२०१९ च्या पहिल्या सहा महिन्यामध्ये एक कोटी नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे.  यातील ७० लाख नागरिकांना वादळ , पूर, आणि दुष्काळ याचा थेट फटका बसला आहे. तर हवामानातील या आपत्तीमुळे या वर्षाच्या अखेरपर्यंत हा आकडा २. २ कोटीपर्यंत जाईल, आहि शक्यता जागतिक हवामान शास्त्राने व्यक्त केली आहे. या वर्षभरात सर्वत्रच हवामानाचा बदल दिसला आहे. युरोप, ऑस्ट्रेलिया , जपान, या देशामध्ये उष्णेतीची लाट दिसली, तर आग्नेय आफ्रिकेत चक्रीवादळे आली. ऑस्ट्रेलिया व कॅलिफोर्नियातील वणवे नियंत्रणाबाहेर गेले होते, याकडे लक्ष वेधण्यात येत आहे. 
सर्वत्रच २०१९ मध्ये हवामान आणि तापमानाशी संबंधित आपत्तीचा मोठा फटका बसला आहे. या पूर्वी पूर, उष्णतेच्या ;लाटा शतकांमध्ये एकदा येत होत्या. मात्र, आता या आपत्तीची नियमित सामना करावा लागत आहे.

-पीटरी टालस 
सरचटणीस , जागतिक हवामानशास्त्र संघटना 

आपण अजून १. १ अंश सेल्सिअस तापमानातील वाढ सहन करण्यासाठी सक्षम नाही. तापमानातील हि वाढ जीवाष्म इंधनाच्या ज्वलनातून झाली आहे, यामध्ये कोणतीही शंका नाही. 
-फिडरिक ओटो 
उपसंचालक , पर्यावरण बदल संस्था , ऑस्कफर्ड विद्यापीठ 
माद्रिदमध्ये चर्चा 

हवामान बदलावर नियंत्रण आणण्यासाठी करण्यात आलेल्या पॅरिस करारावरून माद्रिद येथे चर्चा सूरु आहे. या करारानुसार , हवामान बदलामुळे होणारी तापमान वाढ दोन अंश सेल्सिअस कमी करण्याचे ध्येय निश्चित केले असून, त्यातील नियम-अटीवर चर्चा होत आहे. यानुसार दरवर्षी कार्बन वायू उत्सर्जन ७. ६ टक्क्यांनी कमी करण्याचे नियोजन असून, त्यातून २०३० पर्यंत १ . ५ अंश सेल्सिअसने तापमान कमी करण्याचे प्रयन्त आहे. 


थोडे नवीन जरा जुने