कोल्हापूर जिल्ह्यात धुवांदार पाऊस, पंचगंगेचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर

  कोसळत आहे. गगनबावड्यासह राधानगरी, शाहूवाडी तालुक्यात अतिवृष्टी झाली असून धरणक्षेत्रातही जोरदार

आहे. नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असून पंचगंगेचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे. एक राज्य व दोन प्रमुख जिल्हा मार्ग बंद असून २२ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.जिल्ह्यात बुधवार पासून दोन दिवस धुवांदार पाऊस कोसळणार असा अंदाज हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार मंगळवारी रात्रीपासूनच पावसाने जोर पकडला. सकाळी तर त्यात वाढ होत जाऊन अक्षरशा सुपाने पाणी ओतावे तशा पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे नाले तुडूंब होऊन रस्त्यांतून पाणी वाट शोधून जात होते.

गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यात तर एक सारखा धुवांदार पाऊस राहिल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील बनले होते. कोल्हापूर शहरातही दिवसभर पाऊस राहिला असून पंचगंगेची पातळी यंदा दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे. सायंकाळी पाच पर्यंत २९ फुटांवर पातळी पोहचली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने