“एकनाथ शिंदे १५ आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते, पण…”, अशोक चव्हाणांनंतर चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा

 काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी फडणवीस सरकारच्या काळात एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचं एक शिष्टमंडळ काँग्रेससोबत सत्तास्थापनेचा प्रस्ताव घेऊन आल्याचा गंभीर दावा केला. यानंतर आता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे १५ आमदारांच्या गटासह काँग्रेसमध्ये जाणार होते, असा दावा खैरेंनी केलाय. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तसेच चर्चांना उधाण आलं आहे. खैरे एबीपी माझाशी बोलत होते.



चंद्रकांत खैरे म्हणाले, “हे खरं आहे की, फडणवीस सरकारच्या काळातच एकनाथ शिंदेंसह काही नेते अशोक चव्हाण यांच्याकडे सत्तास्थापनेचा प्रस्ताव घेऊन गेले होते. एवढंच नाही तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा एकनाथ शिंदे आम्हाला काँग्रेसमध्ये यायचं आहे असं म्हणत मागे लागले होते. यावेळी काही लोकही उपस्थित होते. यासाठी त्यांनी खूप पाठपुरावा केला, पण ते शक्य झालं नाही.”

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने