निर्मला सीतारमन यांच्या टीकेला शिवसेनेचं प्रत्युत्तर

Maharashtra Breaking News : राज्यात सध्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांचा पारंपारिक दसरा मेळावा होणार आहे. तर, शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने गर्दी जमवण्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार ताकद लावली जात आहे. तसेच,मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असणाऱ्या भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडेंसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. पंकजा मुंडे या भाजपामध्ये अस्वस्थ असून त्या लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देतील असं मिटकरींनी म्हटलं आहे.

मुंबई महापालिकेचे कर्मचारी, शिक्षक आणि बेस्ट बस कर्मचाऱ्यांना २२ हजार ५०० रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. आरोग्य सेविकांना एक पगार दिवाळी बोनस म्हणून दिला जाईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने