काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट ; मल्लिकार्जुन खर्गे झाले IN तर दिग्विजय सिंह OUT!

केरळ : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची सध्या जोरदार रणधुमाळी सुरू आहे. आज(शुक्रवार) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून वेगवान घडमोडी घडताना दिसत आहेत. आज सकाळपर्यंत अध्यक्ष पदाच्या शर्यतीत असणारे दिग्विजय सिंह यांनी या आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार नसल्याचे जाहीर केले आहे. तर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे हे आता या शर्यतीत दाखल झाले आहेत. तर शशी थरूर यांनी सुद्धा आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सध्यातरी शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात अध्यक्षपदासाठी लढत होणार असल्याचे चित्र आहे.

दिग्विजय सिंह यांनी प्रसारमाध्यामांना माहिती देताना सांगितले की “खर्गे हे माझे वरिष्ठ आहेत. मी काल त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो आणि त्यांना सांगितले की त्यांनी जर त्यांनी उमेदवारी अर्ज भरला तर मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही. त्यांनी सांगितले होते की ते अर्ज दाखल करणार नाहीत. परंतु नंतर मला प्रसारमाध्यमांमधून समजले की ते उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.”टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने