प्रशासनात सर्वागीण दृष्टिकोनाची गरज : मोदी

नवी दिल्ली : ‘‘प्रशासकीय कारभाराचे विकेंद्रीकरण होऊन ते दिल्लीबाहेर देशात विविध प्रांतांत कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे सनदी सेवेतील अधिकाऱ्यांनी आपल्या कामात सर्वागीण दृष्टिकोन अवलंबण्याची गरज आहे,’’ अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.


२०२२ च्या सहायक सचिव कार्यक्रमाच्या समारोप सत्रात २०२० च्या तुकडीतील अधिकाऱ्यांना संबोधित करताना मोदींनी सांगितले, की तुम्हाला ‘अमृतकाळा’त देशाची सेवा करण्याची आणि ‘पंचप्राण’ साकारण्यात मदत करण्याची संधी आहे. ‘अमृतकाळा’त विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यात ते महत्त्वाची भूमिका साकारू शकतात. २०४७ मध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्धापन दिनापर्यंतच्या कालावधीला पंतप्रधानांनी ‘अमृत काळ’ असे संबोधले आहे आणि भारताला विकसित देश बनविण्यासाठी ‘पंच प्राण’ (पाच प्रतिज्ञा) दिल्या आहेत.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने