‘बिग बॉस १६’मध्ये करण जोहर दिसणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत; ‘या’ कारणामुळे झाले सलमानचे शूटिंग रद्द

मुंबई : अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या कामांमध्ये व्यस्त आहे. त्याचा हा बहुचर्चित चित्रपट पुढच्या वर्षी बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. त्याच्या सलमान खान फिल्म या निर्मिती संस्थेद्वारे या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चाहते या चित्रपटाची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. या व्यतिरिक्त त्याच्या ‘एक था टायगर’ या लोकप्रिय फ्रेन्चायझीमधला तिसरा चित्रपट ‘टायगर ३’ नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटामध्ये कॅमिओ करणार आहे.सध्या टेलिव्हिजन विश्वामध्ये ‘बिग बॉस हिंदी’च्या नव्या पर्वाची चर्चा आहे. काही आठवड्यांपूर्वी सुरु झालेल्या कार्यक्रमाचा आनंद प्रेक्षक घेत आहेत. मागच्या अनेक वर्षांपासून सलमान खानने या प्रसिद्ध शोमध्ये सूत्रसंचालक म्हणून काम केले आहे. आता बिग बॉस आणि सलमान खान हे समीकरण तयार झाले आहे. या कार्यक्रमासंबंधित महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ‘बिग बॉस १६’च्या पुढच्या काही भागांमध्ये सलमानच्या जागी नवा सूत्रसंचालक दिसणार आहे. काही आठवड्यांसाठी त्याने ब्रेक घेतला आहे.

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान खानला डेंग्यू झाला आहे आणि त्याला डॉक्टरांनी घरी राहून आराम करायचा सल्ला दिला आहे. परिणामी ‘बिग बॉस १६’च्या काही भागांसाठी करण जोहरला बोलवण्यात आले आहे. यासाठी सलमानने त्याला स्वत:हून शोमधील पुढच्या भागांचे होस्टिंग करण्यासाठी राजी केले. करोना काळामध्ये ‘बिग बॉस ओटीटी’ हा नवा कार्यक्रम सुरु झाला होता. या कार्यक्रमामध्ये करणने सूत्रसंचालन केले होते.१९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटामध्ये अमन हे पात्र साकारण्यासाठी अनेक कलाकारांनी नकार दिला होता. हा चित्रपट करणसाठी खूप खास होता. या एका पात्राच्या कास्टिंग होत नसल्यामुळे तो चिंतेत होता. पुढे सलमानने ही भूमिका करण्यास होकार दिला. तेव्हापासून करण आणि सलमानमध्ये चांगले संबंध आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने