'कंतारा'ला दणका! 'वराह रूपम'गाणं वापरण्यास कोर्टाची मनाई...

मुंबईः  'कंत्तारा'चित्रपटाची भुरळ हि सर्वांनाच पडली आहे. याचित्रपटाने अनेक विक्रमी रेकॉर्ड केले आहेत. मात्र आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कर्नाटकच्या एका ग्रामीण भागामध्ये भूतकोला नावाची एक प्रथा आहे. कांतारामध्ये ती दाखवण्यात आली आहे. त्यावरुन आता वाद सुरु झाला आहे. त्याआधी कातांरा चित्रपटातील 'वराह रूपम'गाण्याच्या ओळी चोरल्याचा आरोप 'थैक्कुडम ब्रिज' या लोकप्रिय बँडने केला होता आणि कॉपीराइटचे उल्लंघन केल्याचा आरोप करत याचिका दाखल केली होती.यापार्श्वभूमीवर कोझिकोड जिल्हा सत्र न्यायालयाने 'कंतारा'मधील 'वराह रूपम' हे गाणे वापरण्यास अंतरिम मनाई आदेश ठोठावला आहे.ओटीटी प्लॅटफॉर्म, संगीत चॅनेल, वेबसाइट आणि यूट्यूब याशिवाय निर्माता, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शकासह चित्रपटाच्या निर्मात्यांना थैक्कुडम ब्रिज बँडच्या परवानगीशिवाय गाणे वापरण्यास या आदेशाअंतर्गत बंदी घालण्यात आली आहे.या बँडचे प्रतिनिधीत्व सतीश मूर्ति यांनी केले, जे भारताच्या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहे. वराह रूपम' हे गाणे थैक्कुडम ब्रिज बँडच्या लोकप्रिय क्रमांक 'नवरसम' सारखेच आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर हा आदेश देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने