उद्धव ठाकरेंच्या परवानगीने किशोरी पेडणेकर CM शिंदेंना भेटणार

मुंबई : शिवसेनेत बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे दोन गट पडले आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याकडून पेडणेकरांवर वारंवार गैरव्यवहाराचे आरोप होत आहेत.शिवसेनेतल्या बंडानंतर एखादा नेता एकनाथ शिंदेंची भेट घेणार, असं ऐकलं की राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण येते. अशाच चर्चा आताही होऊ लागल्या आहेत. पण किरीट सोमय्यांकडून सातत्याने होत असलेल्या गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे आपण शिंदेंची भेट घेत असल्याचं पेडणेकर यांनी सांगितलं आहे. या भेटीची तारीख आणि वेळ मात्र अद्याप ठरलेली नाही.

या भेटीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही परवानगी दिलेली आहे. त्यानंतर त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहेत. दरम्यान, पेडणेकर यांच्या सासूबाई विजया पेडणेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने काल निधन झालं आहे. आपल्यावर होणाऱ्या आरोपांमुळे वयस्क विजया पेडणेकर यांनी धसका घेतला आणि त्यांचा मृत्यू झाला, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने