टाटाने लॉन्च केले 'या' स्वस्त कारचे CNG मॉडेल, जाणून घ्या किंमत अन् मायलेज

मुंबईः टाटा मोटर्सच्या पोर्टफोलिओमध्ये टियागोने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. टाटाच्या नव्या कारच्या इनिंगची सुरुवात टियागोपासूनच झाली आहे. टियागोनंतर टिगोर, नेक्सन, अल्ट्रोज आणि पंच या गाड्याही चालकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. त्यानंतर आता कंपनीने Tiago NRG चे iCNG देखील लॉन्च केले आहे. Motor Arena ने यासंबंधीचे अपडेट शेअर केले आहे.Tiago NRG CNG ची किंमत

सध्याच्या Tiago NRG XT साठी ग्राहकांना 6.42 लाख रुपये आणि XZ साठी 6.83 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. रेग्युलर Tiago च्या CNG ची किंमत त्यांच्या पेट्रोल गाड्यांच्या तुनेत 91 हजारांहून अधिक आहे. त्यानंतर Tiago NRG CNG ची किंमत एकसारखी ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास Tiago NRG XT CNG ची एक्स-शोरूम किंमत 7.33 लाख रुपये आणि NRG XZ CNG ची किंमत 7.74 लाख रुपये असू शकते.

Tiago NRG CNG इंजिन

Tiago NRG मध्ये CNG 1.2-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे CNG वर चालते. या गाडीचा मायलेज 26.4km/kg असेल. लाँच करण्यात आलेल्या या गाडीची अधिकृत किमतीची घोषणा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात केली जाऊ शकते. ही गाडीग्रे, व्हाईट, रेड आणि फॉलीएज ग्रीन कलरमध्ये लॉन्च केली जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने