'हेच जर एखाद्या मुलीच्या बाबत घडलं असतं तर...' उर्वशी संतापली

मुंबई : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या रुममध्ये घुसलेल्या एका अनोळखी व्यक्तीनं व्हिडिओ तयार करुन तो व्हायरल केला आहे. तो व्हिडिओ व्हायरल होताच विराटनं राग व्यक्त केला आहे. तो प्रचंड संतापला असून हे असं कसं झालं याचा तो शोध घेतोय. याशिवाय त्यानं आपल्या चाहत्यांना देखील काही गोष्टींबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.उर्वशीनं एक पोस्ट शेयर करुन विराटच्या बाबत घडलेल्या प्रसंगाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. असा प्रसंग एखादा जर मुलीच्या बाबत घडला असता तर काय झाले असते, मला तर खूप भीती वाटली विराटच्याबाबत ऐकून. मुलीच्या रुममध्ये असं काही घडले असते तर काय झाले असते असा प्रश्न उपस्थित करुन उर्वशीनं आपली खंत व्यक्त केली आहे. ज्यानं कुणी हे केलं आहे त्याला लाज कशी वाटली नाही. अशा शब्दांत उर्वशीनं आपला राग व्यक्त केला आहे.
अनुष्काही नाराज झाली...

माझ्या पतीच्याबाबत जे घडलं ते अतिशय चीड आणणारे आहे. लोकं कसंही वागू लागली आहेत. ते भान सोडून वागत आहे. याचा जास्त राग आहे. गेल्या काही दिवसांपासून आम्ही या गोष्टींना सामोरं जात आहोत. आमच्या मुलीच्याबाबत देखील असा प्रसंग आला होता. आम्ही अनेकदा नेटकऱ्यांना बजावले होते की, आमच्या मुलीचा वामिकाचा फोटो घेऊ नका. मात्र त्यांनी काही ऐकले नाही. आणि तो फोटो व्हायरल झाला होता. आता जे घडलं आहे त्यात ज्याचा कुणाचा हात आहे त्याला सोडणार नाही. असे अनुष्कानं सांगितलं आहे.

विराटनं देखील असा प्रकार घडल्यानंतर नाराजी व्यक्त केली आहे. हे असं जर घडलं तर आमची काय सुरक्षा आहे, नेटकऱ्यांनी थोडी का होईना संवेदनशीलता ठेवावी, आमची प्रायव्हसी नावाची काही गोष्ट आहे की नाही, असा प्रश्न विराटनं यावेळी उपस्थित केला होता. सोशल मीडियावर देखील विराटच्या बाबत घडलेल्या त्या प्रसंगानं नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने