आदिपुरुष चित्रपटाचे निर्माते घाबरले? प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली!

मुंबई :  प्रभास आणि सैफ अली खान स्टारर चित्रपट 'आदिपुरुष' हा 2023 साली प्रदर्शित होणार्‍या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात रामायणाची कथा थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आली आहे. आदिपुरुष या चित्रपटापासुन चाहत्यांना खुप अपेक्षा होत्या मात्र त्याचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट चांगलाच वादात अडकलाय.


टीझर रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट त्याच्या व्हीएफएक्ससाठी ट्रोल झाला होता, पण असे असूनही, चित्रपटाला पाठिंबा देणाऱ्या आणि त्याची वाट पाहणाऱ्या लोकांची कमी नाही.मात्र चित्रपटाच्या पदर्शनासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे.प्रभास आणि सैफ अली खानचा हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता,  मात्र, दिग्दर्शक ओम राऊत यांनी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे की आता हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार नसून 2023 च्या उन्हाळ्यात येईल. पण, निर्मात्यांनी एवढा मोठा निर्णय का घेतला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यामागचे कारण असे सांगितले जात आहे की,  ज्या आठवड्यात 'आदिपुरुष' रिलीज होणार आहे, त्याच आठवड्यात साऊथ सुपरस्टार चिरंजीवीचा 'वाल्टेयर वीरय्या' आणि नंदामुरी बालकृष्णन स्टारर 'वीरा सिम्हा रेड्डी' देखील प्रदर्शित होणार आहेत. इतकंच नाही तर बॉक्स ऑफिसवर प्रभास स्टारर 'आदिपुरुष'ला टक्कर देण्यासाठी थलपथी विजयचा 'वारिसू' चित्रपटही रिलीज होणार आहे.अशा परिस्थितीत 'आदिपुरुष'ला आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये हवा तसा प्रतिसाद आणि स्क्रीन मिळणार नाही, अशी भीती निर्मात्यांना असावी,असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.अयोध्येत चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला तेव्हा चित्रपटाला त्याच्या व्हीएफएक्समुळे खूप ट्रोल करण्यात आले. सोशल मीडियावर युजर्सनी टीझरमध्ये सैफ अली खानचा रावण, हनुमान जी, भगवान राम आणि सीता यांच्या भूमिकेत असभ्य लूक दाखवण्यात आला असल्याचा आराप केला तर काहींनी त्याच्या लूकची खूप खिल्ली उडवली. या चित्रपटात दाखवले जाणारे व्हीएफएक्स अतिशय वाईट असल्याचेही लोकांनी सांगितले.

इतकचं नाही तर नेटकऱ्यांनी VFX ची तुलना टेंपल रन गेमशी केली. यानंतर 'आदिपुरुष'चे निर्माते ओम राऊत, प्रभास, सैफ अली खान यांच्यासह पाच जणांविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली होती. अशा परिस्थितीत निर्माते चित्रपटात मोठे बदल करण्याचा विचार करत असावे आणि त्यामुळे चित्रपटाच्या पदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली असल्याचा अंदाज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने