Elon Musk ला मोठा धक्का! 'जनरल मोटर्स'नं ट्विटरवरील जाहिरातींबाबत घेतला महत्वाचा निर्णय

अमेरिक: टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क आता मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरचेही मालक बनले आहेत. त्यांनी शुक्रवारी ट्विटरची कमान हाती घेतली. ट्विटरची कमान हाती घेतल्यानंतर जनरल मोटर्सनं मोठं पाऊल उचललंय.जनरल मोटर्सनं ट्विटरवरील जाहिरातींना  तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतलाय. अमेरिकन मीडियानं  ही माहिती दिलीय. टेस्लाचा सहयोगी असलेल्या डेट्रॉईट ऑटोमेकरनं शुक्रवारी सांगितलं की, ते प्लॅटफॉर्म कसं बदलेल याबद्दल ट्विटरशी बोलत आहे.याबाबत जनरल मोटर्सनं सांगितलं की, शक्य तितक्या काळासाठी ट्विटरवरील जाहिराती तात्पुरत्या थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. जनरल मोटर्सचे (GM) प्रवक्ते डेव्हिड बर्नास म्हणाले, आम्ही नवीन मालकी अंतर्गत प्लॅटफॉर्म (Twitter) समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कंपनीचे महत्त्वाचे बदल आणि त्यांचे नवीन नियम समजेपर्यंत आम्ही आमची सशुल्क जाहिरात तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतलाय. डेव्हिड बर्नास म्हणाले, 'ट्विटरवर आमचे ग्राहकांशी संभाषण सुरूच राहील.'

इलॉन मस्क यांनी शुक्रवारी ट्विटरची सूत्रं हाती घेताच कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल आणि विजया गड्डे यांच्यासह कंपनीच्या चार उच्च अधिकाऱ्यांना हटवलं. इलॉन मस्कनं ट्विटर 44 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतलं. इलॉन मस्क यांनी या करारानंतर ट्विटरमध्ये बदल करण्यास सुरुवात केलीय. त्यांनी म्हटलंय, की 'त्यांना ट्विटरला एक असं व्यासपीठ बनवायचं आहे, जिथं लोक हिंसा आणि द्वेषाशिवाय एकमेकांशी बोलू शकतील.'

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने