“आम्ही खूप चांगले मित्र-मैत्रीण आहोत पण…”, आकांक्षा पुरीचे मिका सिंगबद्दल आश्चर्यकारक विधान.

मुंबई : सुप्रसिद्ध गायक मिका सिंगच्या गाण्याचे लाखो चाहते आहेत. त्याने आजवर अनेक सुपरहिट गाणी बॉलिवूडला दिली. त्याची गाणी अगदी थिरकायला लावणारी असतात. आपल्या कामामुळे मिका हा सतत चर्चेत असतो. त्याशिवाय मिकाचं खाजगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेत असते. यावर्षी आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची जेवढी चर्चा झाली तेवढीच मिका सिंगच्या स्वयंवरचीही झाली. या स्वयंवरात मिकाने आकांक्षा पुरीला आपली वधू म्हणून निवडले होते. यानंतर हे दोघे कधी लग्न करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आकांक्षाने नुकत्याच केलेल्या एका विधानाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.मिका सिंगच्या स्वयंवरला तीन महिने उलटून गेले आहेत, मात्र अद्याप लग्नाची कोणतीही बातमी नाही. नुकतीच तिने ‘ई टाईम्स’ला एक मुलाखत दिली, तेव्हा तिने तिच्या आणि मिकाच्या नात्याबद्दल बरीच गुपितं उघड केली. ती म्हणाली, “आम्ही गेली अनेक वर्ष एकमेकांचे चांगले मित्र आहोत आणि आम्ही पुढेही राहू. पण आम्ही फक्त मित्र आहोत, कपल नाहीत.”पुढे ती म्हणाली, “आम्हाला स्वयंवरामध्ये जोडीदार निवडायचा होता, म्हणून आम्ही एकमेकांना निवडले. कारण आमची अनेक वर्षांची ओळख आहे. याचा अर्थ आम्ही प्रेमात आहोत असे आम्ही कधीही म्हटले नाही. आम्हाला जोडीदार हवा आहे यावर आम्ही ठाम होतो. फक्त आधीपासून ओळखत असलेल्या व्यक्तीला आम्ही प्राधान्य दिले. पण शोनंतर आमच्यात काहीही बदल झाला नाही. आम्ही आजही तितकेच चांगले मित्र आहोत.”

यासोबतच “आम्ही एकमेकांची काळजी घेतो, एकमेकांचा आदर करतो. आम्हा दोघांनाही आयुष्यात अनेक वाईट अनुभव आले आहेत, त्यामुळे आम्हाला हे नाते लग्नात रूपांतर करण्याची घाई नाही. याशिवाय आम्ही सध्या आपापल्या कामात व्यस्त आहोत,” असेही आकांक्षाने सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने