हर मर्द को दर्द होता है! म्हणत अक्षय केळकर ढसाढसा रडला..

मुंबई:  'बिग बॉस मराठी'मध्ये दिवाळीचे दणक्यात सेलिब्रेशन झाल्यानंतर आता पुन्हा एकदा टास्क, राडे, वाद याला सुरुवात झाली आहे. बिग बॉसने स्पर्धकांपुढे एक मोठा पेच टाकला आहे. 13 स्पर्धकांपैकी मोजक्याच स्पर्धकांना आपल्या घरच्यांशी बोलायची संधी मिळणार आहे. पण त्यासाठी स्पर्धकांनी आपापसातच ठरवायचे आहे, ही कोण आपल्या घरच्यांशी बोलायचं आहे. यावरून घरात मोठे इमोशनल वातावरण झाले आहे.बिग बॉसच्या आदेशानंतर प्रत्येकजण आपआपल्या आई वडिलांविषयी बोलत आहे. अपूर्वा म्हणते माझी आई घरी एकटी आहे, मला प्लीज तिच्याशी बोलू द्या, आणि ती रडू लागली. यावर विकास देखील आईच्या आठवणीत भाऊक झाला, पण अक्षय केळकर मात्र खूपच भाऊक लागला. कारण त्याचे आई वडील एकमेकांशी मतभेद असल्याने वेगळे राहतात. त्यामुळे त्याच्याशी आई बोलणार की बाबा ही देखील त्याला माहीत नाही. म्हणून तो धायमोकळून रडतो. त्याचे हे रूप पाहून सगळेच हादरतात. त्याच विषय आज अक्षय बोलताना दिसणार आहे.यावरून योगेश अक्षयला रडूबाई म्हणाला. अक्षय त्याबाबत अमृता आणि समृद्धीशी चर्चा करताना दिसणार आहे. अक्षय म्हणतो, 'तुम्हांला माहिती आहे मला तो काल काय म्हणाला ? तू खरंच रडूबाई आहेस रे, नाटक करतोस. नाटक करायचं असतं तर मी काल आई बाबांचा फोटो घेऊन रडत बसलो असतो ड्रामा संपल्यानंतर. हर मर्द को दर्द होता है, और में वो छुपाने वाला मर्द नही हूं!' समृद्धीचे म्हणणे आहे, 'तो चांगला माणूस आहे, त्याचा पण struggle आहे.' अक्षय म्हणाला, 'पण असं म्हणणं चुकीचे आहे ना ?'

अमृता म्हणाली, 'आम्ही तिघे जरी बसलो असू ना तरी तो म्हणे तू beautiful आहेस, तू हॉटच आहेस मग तिला सारखं बोलत बसायचं. मी काय बावळट आहे का? ती सगळ्यांपेक्षा उजवी आहे असेल तिचा स्वभाव आहे चांगला... मला देखील मान्य आहे मी मैत्रीण आहे तिची. पण हे काय आहे दरवेळेस. मला म्हणे हीचा स्वभाव चांगला आहे तुझं बोलणं चांगलं नाही. मी म्हंटलं माझं बोलणं असंच आहे. मी तोंडावर बोलते जे काही असेल ते मला नाही जमंत...' अमृतानेही योगेशविषयी आपल्या भावना व्यक्त केली. आता आज रात्री त्यावरून काय राडा होणार आहे हे कळेलच.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने