‘ढोंगी’ म्हणत नेटकऱ्यांनी घेतली अक्षय कुमारची शाळा, व्हायरल व्हिडीओमुळे करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना

मुंबई : बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार एक फिटनेसप्रेमी अभिनेता म्हणून ओळखला जातो. तो त्याच्या तब्येतीच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड करत नाही. एवढेच नाही तर अक्षयचे शिस्तबद्ध जीवनही कायम चर्चेत असते. तो उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्यांपासून स्वतःला दूर ठेवतो. याचे मुख्य कारण म्हणजे तो पहाटे लवकर उठून वर्कआऊट करण्याला प्राधान्य देतो. अक्षयच्या या सवयींसाठी सगळेजण त्याच्याकडे आदराने बघतात. मात्र, आता अक्षयचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून त्याचे चाहतेही हैराण झाले आहेत. इतकेच नाही तर, या व्हिडिओमुळे नेटकरी अक्षय कुमारची शाळा घेत आहेत.काल रात्री अक्षय कुमार अश्विन यार्दीच्या वाढदिवसाच्या पार्टीला पोहोचला होता. आता त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी अक्षयला ‘ढोंगी’ म्हणत आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये अक्षय कुमार त्याच्या कारमधून बाहेर पडताना दिसत आहे. एका रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तो मीडिया फोटोग्राफर्सना पोझदेखील देत आहे. यावेळी त्याने काळी हुडी, काळी जीन्स आणि पीच रंगाचे स्नीकर्स घातले होते. 

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर काही जणांनी अक्षयच्या लूकची आणि त्याच्या फिटनेसची प्रशंसा केली, तर काहींनी अक्षयला ट्रोल करण्यास सुरुवात केली.अक्षय कुमारच्या व्हिडिओवर कमेंट करत एकाने लिहिले, “रात्र झाली, तू अजून झोपला नाहीस? पहाटे ४ वाजता कसे उठणार.” याशिवाय आणखी एका यूजरने कमेंट करत विचारले, “तो पार्टीला कधी जायला लागला?” तसेच दुसऱ्या नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिले, “लवकर झोपा, पहाटे ४ वाजता उठायचे आहे सर.”अक्षय कुमारने त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे हा, तो रात्री ९:३० पर्यंत झोपतो आणि पहाटे ४ किंवा ४:३० वाजता उठतो. त्यानंतर तो वर्कआउट करतो. तो कधीही उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्यांमध्ये सहभागी होत नाही. पण आता अक्षय रात्री उशिरा पार्टीत जाताना दिसल्याने नेटकरी त्यांच्यावर निशाणा साधत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने