आलिया लग्नाआधीच गरोदर होती? बहीण शालीन भट्ट म्हणते…

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. एप्रिल महिन्यात आलिया आणि बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर विवाहबंधनात अडकले. त्यानंतर जून महिन्यात आलिया-रणबीरने आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांनी दिली. लग्नानंतर दोन महिन्यातच आलिया-रणबीरणे गूड न्यूज दिल्यामुळे आलिया लग्नाआधीच गरोदर होती का?, अशी चर्चा रंगली होती.

आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हॉस्पिटलमधील फोटो पोस्ट करत ती गरोदर असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे कपूर कुटुंबियांसह तिच्या चाहत्यांनाही आनंद झाला होता. परंतु यावरुन आलिया-रणबीरला ट्रोलही करण्यात आलं होतं. आता आलियाची बहीण शालीन भट्टने यावर भाष्य केलं आहे. आलिया-रणबीरला ट्रोल करणाऱ्यानांबद्दलही तिने तिचं व्यक्त केलं आहे.शालीन भट्टने नुकतीच न्यूज १८ला मुलाखत दिली. ती म्हणाली, “आलियाबद्दल मी बोलणार नाही. हे तिचं आयुष्य आहे. आलियाच्या गरोदरपणामुळे तिला ट्रोल केलं जात आहे.


तिच्या प्रत्येक पोस्टवर काही निराशाजनक, ट्रोल करणाऱ्या कमेंट असतात. परंतु, कोणत्या कमेंटकडे लक्ष द्यायचं आणि कशावर नाही, हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे”.पुढे ती म्हणाली, “हे वर्ष आम्हा सगळ्यांसाठीच खूप चांगलं गेलं आहे. आता आलियाच्या बाळामुळे आमच्या आयुष्यात आणखी आनंद येणार आहे. यासाठी मीदेखील उत्सुक आहे”. दरम्यान, आलियाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने