आता फार झालं...भर कार्यक्रमात अमित शाह संतापले

दिल्ली :  गृहमंत्री अमित शाह यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. शाह आपल्याच पक्षाच्या नेत्यावर प्रचंड संतापले असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायाल मिळत आहे. आता फार झालं. तुमचं भाषण थांबवा, अशा शब्दात त्यांनी आपल्याच नेत्याला खडसावलं. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
एका कार्यक्रमात हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज भाषण करायला उभे होते. विज यांचं भाषण लांबल्याने अमित शाह अस्वस्थ झाले. विज यांच्या 8 मिनिटाच्या भाषणात शाह यांनी त्यांना चारवेळा टोकलं. तरीही विज यांनी भाषण सुरूच ठेवलं. त्यामुळे शाह संताप व्यक्त केला. तुम्हाला पाच मिनिटं दिली होती, आता फार झालं. तुमचं भाषण थांबवा, असं अमित शाह यांनी म्हटलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने