लेकाने दिलेलं ‘ते’ वचन, घट्ट मिठी मारली अन्…; अमिताभ बच्चन मंचावरच रडू लागले, भावुक व्हिडीओ एकदा पाहाच

 

मुंबई :बिग बी अमिताभ बच्चन यांचा ८०वा वाढदिवस ११ ऑक्टोबरला दणक्यात साजरा करण्यात आला. जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी अमिताभ यांना आपल्या अंदाजामध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमाच्या मंचावरही त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अमिताभ बच्चन बर्थडे स्पेशल भागामध्ये त्यांचा लेक अभिनेता अभिषेक बच्चन तसेच पत्नी जया बच्चन यांनी हजेरी लावली होती. यावेळी मंचावरच ते रडू लागले.बिग बींना अश्रू अनावर
अभिषेकने ‘केबीसी’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी आपलं आपल्या वडिलांवर किती प्रेम आहे याबाबत तो बोलत होता. तसेच अभिषेक यावेळी वडील अमिताभ बच्चन यांच्याबाबत भरभरून बोलत होता. तो म्हणाला, “तुमचं अंथरूणचं माझं खेळण्याचं मैदान होतं. खेळणी मिळावी म्हणून तुमच्यासाठी मी भांडातोय, जमीनीवर लोळायचो. आजारी पडलो की तुम्ही मला बऱ्याचदा ओरडला आहात. मला तुमच्या मनामध्येच नव्हे तर हृदयामध्येही जागा दिली.”अभिषेक हे सारं बोलत असताना अमिताभ आपसूकच रडू लागतात. वडील रडत आहेत हे पाहून अभिषेक पुन्हा म्हणतो, “तुम्ही माझ्यावर प्रेम केलं. पण त्याहीपेक्षा जास्त प्रेम तुम्ही श्वेता दीदीला दिलं.” अभिषेक अगदी गंमतीने म्हणाला. त्यानंतर लहानपणी बास्केट बॉलच्या मॅचदरम्यान अभिषेकला पाठिंबा देण्यासाठी अमिताभ बच्चन जायचे. याबाबतही अभिषेकने सांगितलं.

“मी तुमच्याकडून खूप काही शिकलो आहे. ८०व्या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला काय गिफ्ट देऊ हे मला कळत नाही. पण एक वचन देतो की, जेव्हा जेव्हा तुम्ही दुःखामध्ये असेल तेव्हा तुमचा हा मुलगा तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभा असेल. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो.” अभिषेकचं हे बोलणं ऐकून अमिताभ यांना अश्रू अनावर झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने