असे लोक हवेत जे कधीही आग लावू शकतात.. अमृता फडणवीसांचं वादग्रस्त विधान

मुंबई:बिग बॉस च्या घरात सदस्यांची भांडणं, वाद आपल्याला परिचित आहेतच. पण आता सदस्यांपेक्षा अमृता फडणवीसच जास्त चर्चेत आहेत. बिग बॉसच्या घरात त्यांनी हजेरी लावली होती, यावेळी त्यांनी अनेक खळबळजनक विधाने करत सर्वांना धक्काच दिला.आपल्या गाण्यांमुळे आणि राजकीय विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या अमृता फडवणीस आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत, त्याचं कारणही अगदी खास आहे. अमृता सध्या बिग बॉसच्या घरात धमाल करत आहेत. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अमृता यांनी काही राजकीय विधाने केली आहेत.

बिग बॉस मराठी'मध्ये दिवाळीचे दणक्यात सेलिब्रेशन सुरू आहे. अगदी कंदील बनवण्यापासून ते फराळ खाण्यापर्यंत दिवाळीचा आनंद स्पर्धक लुटत आहेत. नुकतीच या घरात राजवर्धन आणि कावेरी या कलर्स मराठीवरील 'भाग्य दिले तू मला' या लोकप्रिय मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली. काल तर चक्क महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडवणीस यांनी बिग बॉस मराठीच्या घरात हजेरी लावली. यावेळी त्यांनी स्पर्धकांसोबत धमाल केलीच पण एक मोठे विधानही केले.



यावेळी किरण माने आणि यशश्री मसूरकर या दोघांनी अमृता फडणवीसांना काही प्रश्न विचारले. किरण म्हणाले, ''महाराष्ट्राचं राजकीय वर्तुळ हे बिग बॉस असेल तर त्यातले टॉप पाचचे सदस्य कोण असतील असं तुम्हाला वाटतं. त्यावर अमृता म्हणाल्या,. 'आपल्याला डॅशिंग लोक लागतात. जे कुठेही काहीही बोलतू शकतील. जे आग लावू शकतील.' पुढे किरण म्हणाले, 'आमच्याप्रमाणे तुमच्यातही वाद होत असतील. हे काम कोण करणार, ते काम कोण करणार..' त्यावर अमृता म्हणाल्या.. 'त्यासाठी नवरा हाताला तर लागायला हवा..' त्यांच्या या धम्माल उत्तराने सर्वांनाच हसू आले. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने